Monday, June 26, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजनेचे अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ शिष्यवृत्ती योजनेचे

अर्ज दाखल करण्याची मुदत 15 जुलैपर्यंत

 

अमरावती, दि. 26 : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित अमरावती जिल्हा कार्यालयांतर्गत जिल्ह्यातील मातंग समाज व तत्सम 12 पोटजातीतील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना राबविली जाते. या योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी सन 2022-23 या शैक्षणिक वर्षामध्ये 10 वी, 12 वी, पदवी, पदव्युत्तर वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी सरासरी 60 टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त केले आहे, अशा विद्यार्थ्यांना गुण क्रमांकानुसार जिल्ह्यातील प्रथम 3 ते 5 विद्यार्थ्यांस निधीच्या उपलब्धतेनुसार प्रोत्साहनपर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येते. गरजू विद्यार्थ्यांनी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड, गुणपत्रिका, बोनाफाईड, दोन छायाचित्र, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रांसह दि. 15 जुलै 2023 पर्यंत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयामागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत येऊन प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...