महिला लोकशाही दिन सोमवारी

 


अमरावती, दि. 16 : महिलांना त्यांच्या तक्रारी दाखल करता याव्यात म्हणून महिला लोकशाही दिनाचे आयोजन प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी करण्यात येते. याकरिता या महिन्याचा तिसरा सोमवार दि. 19 जून 2023 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1, अमरावती येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या महिलांना महिला लोकशाही दिनात तक्रारी दाखल करावयाच्या आहेत, त्यांनी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, दत्तात्रय सदन, दसरा मैदान रोड, भुतेश्वर चौक, देशपांडेवाडी, अमरावती येथे किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, सभागृह क्र. 1 अमरावती येथे तक्रारी दाखल कराव्यात.

            न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यातील अर्जासोबत आवश्यक कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी तसेच वैयक्तिक स्वरुपाची तक्रारी निवेदने, अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ज्या महिलांचे तालुकास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रारीचे निरसन झाले नाही, त्याच तक्रारी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनी सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, अमरावती यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती