नांदगाव (खंडेश्वर) येथील शासकीय निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

 

नांदगाव (खंडेश्वर) येथील

शासकीय निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात

 

            अमरावती, दि. 1 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे चालविण्यात येणाऱ्या अनुसूचित जाती मुलांची शासकीय निवासी शाळा नांदगाव (खंडेश्वर), अमरावती येथील शैक्षणिक सत्र 2023-24 मध्ये प्रवेशासाठी वर्ग 6 वी ते 10 वी (माध्यम सेमी इंग्रजी) साठी प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध आहेत. निवासी शाळेत मोफत भोजन, निवास, सुसज्ज ग्रथांलय (ई-लायब्ररी), ई-लर्निंग डिजीटल पध्दतीने अध्ययन व अध्यापन, संगणक कक्ष, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची सुविधा तसेच अन्य आवश्यक शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत.

            निवासी शाळेतील प्रवेशीत जागांचे आरक्षण अनुसूचित जाती 80 टक्के, अनुसूचित जमाती 10 टक्के, व्ही. जे. एन. टी. 5 टक्के, वि. मा. प्र. 3 टक्के, अनाथ व अपंग 2 टक्के या प्रमाणे वर्गनिहाय आरक्षण राहील. प्रवेश अर्ज दि. 15 जून 2023 पर्यंत भरता येईल. याची संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन शाळेचे मुख्याध्यापक एल. झेड. सुरजुसे यांनी पत्रकाव्दारे कले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती