शासकीय निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरु गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

शासकीय निवासी शाळेतील प्रवेश प्रक्रिया सुरु

गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. ८ : जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेल्या तालुकास्तरावरील मुलींच्या ३ व मुलांच्या ४ अशा एकुण ७ निवासी शाळेमध्ये सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. 

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा हिंगणगाव, ता. धामणगाव रेल्वे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा बुरडघाट, ता. अचलपूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळा पांढरी, ता. अंजगावसुर्जी, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा सामदा का., ता. दर्यापूर, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा तुळजापूर, ता. चांदुररेल्वे, अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा बेनोडा, ता. बेनोडा तसेच अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा नांदगाव खंडेश्वर, ता. नांदगाव खंडेश्वर या

            शासकीय निवासी शाळेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. येथे विद्यार्थ्यांना आवश्यक सोयी -सुविधा पुरविल्या जातात. जसे गणवेश, भोजन, निवास,  आंथरण-पांघरुण मोफत पुरविण्यात येईल. प्रवेशासाठी वर्ग ६ ते १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जिल्ह्यातील तालुकास्तरावरील शासकीय निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क साधावा.

            शासकीय निवासी शाळेतून प्रवेशाबाबत अर्ज प्राप्त करुन इच्छुक पालक व विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज मुख्याध्यापकांकडे सादर करावा .  अधिक माहितीसाठी o७२१- २६६१२६१ या .दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती