वडगाव माहोरे येथे आरोग्य शिबिर संपन्न

 

वडगाव माहोरे येथे आरोग्य शिबिर संपन्न

अमरावती, दि. 16 : विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयामार्फत आयोजित महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत आरोग्य वर्धिनी (वडगाव माहोरे) येथे नुकतेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल नरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आरोग्य तपासणी शिबिरामध्ये बालरोग, मुत्रपिंड संबंधित आजार, किडनी ट्रान्सप्लांट, कर्करोग, हृदयरोग, प्लास्टिक सर्जरी, मेंदूसंबंधीत आजार, मधुमेह, रक्तदाब इत्यादी आजारांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर संशयित रुग्णांना विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय परिसर येथे पुढील उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले.

आरोग्य शिबिराच्या यशस्वीततेसाठी डॉ. मंगेश मेंढे, डॉ. शाम गावंडे, डॉ. दिव्यानी मुंदाने, डॉ. पायल गौपाल यांनी मार्गर्शन केले. शिबिराचे उद्घाटन वडगाव माहोरे सरपंच माला माहोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सिरसाट यांची विशेष उपस्थिती होती.

आरोग्य तपासणी शिबिरात तपासणी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवसे, डॉ. सपना गुप्ता, समुपदेशक दिनेश हिवराळे, रेश्मा गोरले, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. पर्डीकर, आरोग्य सेविका श्रीमती बेलसरे, परिचर श्रीमती हिवराळे, चेतन मुळे, अभिजीत शुक्ला, श्री. खंडारे तसेच बचत गटाच्या श्रीमती सोनोने आदींचे सहकार्य लाभले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती