Monday, June 26, 2023

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास

महामंडळाच्या अनुदान योजनेसाठी अर्ज आमंत्रित

 

            अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अर्जदारांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी व समाजातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी महाराष्ट्र शासनाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत मातंग समाजातील 12 पोट जातीतील लोकांना आर्थिक सहाय्य दिले जाते. चालु आर्थिक वर्षात बीजभांडवल योजनेंतर्गत 50 हजार एक ते 7 लक्ष रूपये पर्यंत जिल्ह्याला 50 कर्ज प्रकरणांचे उदिष्ट प्राप्त झाले आहे. यामध्ये महामंडळाचा सहभाग (अनुदानासह 45 टक्के) लाभार्थी सहभाग 5 टक्के तसेच बॅंकेच्या कर्जाचा सहभाग 50 टक्के असतो. महामंडळाच्या बीजभांडवल रकमेवर 4 टक्के व्याज दर आकारण्यात येतो. अनुदान योजनेंतर्गत पन्नास हजार रूपयेपर्यंतचे कर्ज प्रस्ताव बॅंकेला पाठविण्यात येतात. त्यामध्ये महामंडळाचे अनुदान दहा हजार रूपये असून उर्वरित कर्ज बॅंकेचे असते.

            या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी हा मातंग समाज व त्यातील 12 पोटजातीतील असावा. वयोमर्यादा 18 ते 50 असावी. जातीचा दाखला, उत्पनाचा दाखला, दोन छायाचित्र, रेशन कार्ड, आधार कार्ड, घर टॅक्स पावती, कोटेशन, व्यवसायासाठी जागेचा पुरावा, प्रकल्प अहवाल इत्यादी आवश्यक कागदपत्रांसह साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ मर्यादित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलिस आयुक्त कार्यालयाच्या मागे, अमरावती येथे कार्यालयीन वेळेत येऊन कर्ज प्रस्ताव सादर करावे, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक जे. एम. गाभणे यांनी केले आहे.

***

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...