Friday, June 30, 2023

सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू

 सैनिकी मुलां-मुलींच्या वसतिगृहात

प्रवेश प्रक्रिया सुरू

     माजी सैनिक, वीरपत्नी ज्यांचे पाल्य अमरावती येथे उच्च शिक्षण घेत आहे, त्या पाल्यांच्या शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी सैनिकी मुला-मुलींच्या वसतिगृहातील प्रवेशाची प्रक्रिया सुरु झाली आहे. अमरावतीमध्ये माजी सैनिकी मुलांचे वसतिगृह, नवसारी, जवाहर नवोदय विद्यालयाचे मागे, अमरावती येथे आहे. या वसतिगृहामध्ये एकूण 48 मुलांची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे. तसेच सैनिकी मुलींचे वसतिगृह, नंदनवन कॉलनी, भातकुली तहसीलमागे असून या वसतिगृहामध्येही एकूण 48 मुलींची राहण्याची तसेच भोजनाची व्यवस्था आहे.

माजी सैनिकांच्या पाल्यांना माफक दरात सैन्याच्या रॅंक प्रमाणे भाडे आकारले जाते व वीरपत्नींच्या पाल्यांना या वसतिगृहमध्ये विनामूल्य प्रवेश देण्यात येतो. प्रवेशासाठी प्रवेश पुस्तिका वसततिगृह अधीक्षक, अधीक्षिका व कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. तरी इच्छुक माजी सैनिक व वीरपत्नींच्या पाल्यांनी वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी संबंधित अधीक्षक, अधीक्षिका यांचे कडून प्रवेश पुस्तिका खरेदी करून आपला अर्ज त्यांचेकडे सादर करावा, तसेच सैनिकी  मुलांचे वसतिगृह, नवसारी अमरावती (0721-2530366), (8668964662), सैनिकी मुलींचे वसतीगृह, नंदनवन कॉलनी, अमरावती (0721-2550429), (8830865337), जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, अमरावती (0721-2661126) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...