दिव्यांगांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 5 जुलैपर्यंत

 

दिव्यांगांच्या व्यावसायिक प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याची

मुदत 5 जुलैपर्यंत

 

            अमरावती, दि.13 :  शासन मान्यताप्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर, नांदेड या संस्थेत महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व परीक्षा मंडळ मुंबई मार्फत मान्यताप्राप्त अभ्यासक्रमासाठी 18 ते 40 वयोगटातील अपंग, मुकबधीर, मतिमंद, मुला-मुलींना प्रवेश देण्यात येत आहे. देगलूर येथे दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे मार्फत  तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्रात दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देवून त्यांचे पुर्नवसन करण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रात शिवण, कर्तनकला, कॉम्प्युटर अकाउटिंग, ऑफीस ऑटोमेशन व वेल्डर कम फॅब्रीकेटर इत्यादी अभ्यासक्रमांना प्रवेश देण्यात येत आहे. प्रवेशितांची निवासाची व जेवणाची विनामुल्य सोय केलेली आहे.

          तरी इच्छुक अपंग, मुकबधीर व मतिमंद मुला-मुलींनी किंवा पालकांनी दि. 5 जुलै 2023 पर्यंत प्राचार्य, तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर, जिल्हा नांदेड येथे पत्रव्यवहार करावा किंवा प्रत्यक्ष भेटावे. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक  (9960900369), (9403207100), (7378641136), (9420846887) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन कर्मशाळा अधीक्षक तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र, देगलुर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती