पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

 पेरणीची घाई करू नका; कृषी विभागाचा शेतकरी बांधवांना सल्ला

 जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते यांनी केले आहे.

अमरावती जिल्ह्यातील सरासरी 145.7 मि.मि. पर्जन्यमानाच्या तुलनेत दि. 27 जूनअखेर  54 मि.मि. अर्थात सरासरीच्या 37.1 टक्के पाऊस झाला आहे. मान्सूनच्या आगमनास विलंब व हवामान बदलामुळे सामान्यपणे पाऊस येण्याचा कालावधी पुढे सरकला आहे. भारतीय हवामान विभागाने आज दिलेल्या हवामान अंदाजानुसार दि. 2 ते 8 जुलै दरम्यान कमी पाऊस पडण्याची व पावसात खंड निर्माण होण्याची शक्यता वर्तविली आहे.

 त्यामुळे शेतकरी बांधवांनी पेरणीसाठी घाई करु नये. सर्वसामान्यतः 80 ते 100 मिमि. पर्यत पाऊस पडल्याशिवाय पेरणी करु नये. जमिनीत पेरणीसाठी योग्य ओल असल्याची खात्री करावी. पावसाचा अंदाज घेऊनच पेरणी करावी. ज्या शेतक-यांनी पेरणी केली आहे, त्यांनी पिकांसाठी संरक्षित सिंचनाचा वापर करावा. जमिनीतील ओलाव्याचे संवर्धन करण्यासाठी आच्छादनासारख्या (मल्चिंग) तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन एसएओ श्री. सातपुते यांनी केले.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती