Monday, June 26, 2023

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

 

जिल्हा सामान्य रुग्णालयात जागतिक योग दिन संपन्न

       अमरावती, दि. 26 : जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये जिल्हा सामान्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांचे मार्गदर्शनाखाली 9 वा  जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनीषा सुर्यवंशी, सहायक जिल्हा आयुष अधिकारी डॉ. विपिन टोंगळे तसेच डॉ. अब्दुल मतीन, डॉ. रेहान खान, डॉ. संदीप खांडे, डॉ. प्रियंका मडावी, डॉ. प्रिती मोरे तसेच अधिसेविका ललिता अटाळकर, कविता देशमुख आदी उपस्थित होते.

         योग प्रशिक्षक अमोल भातकुलकर यांनी योग प्रशिक्षण दिले. रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. मालती सरोदे, संदीप भस्मे यांनी सहकार्य केले.

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...