शारिरिक शिक्षण शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबिर 3 जुलैपासून

 

शारिरिक शिक्षण शिक्षकांचे निवासी प्रशिक्षण शिबिर 3 जुलैपासून

अमरावती, दि. 7 : राज्याच्या क्रीडा धोरणानुसार अमरावती जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील 100 शारिरिक शिक्षण शिक्षकांचे जिल्हास्तर निवासी प्रशिक्षण शिबिर 3 ते 12 जुलै 2023 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. विभागीय क्रीडा संकुल, मोर्शी रोड, अमरावती येथे हे शिबिर घेण्यात येणार आहे.

प्रशिक्षण शिबिरामध्ये विविध खेळामधील बदललेले आधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षणाच्या पध्दती, विविध खेळाची तंत्रशुध्द माहिती क्रीडा शिक्षकांना माहिती व्हावी, यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रशिक्षण शिबिरामध्ये जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील व स्थानिक शहरातील शैक्षणिक संस्था, जिल्हा परिषद शाळामधील शारिरिक शिक्षण शिक्षक यात सहभागी होऊ शकतात. यासाठी इच्छुकांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामध्ये 15 जूनपर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधून आपल्या नावाची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती