Tuesday, June 27, 2023

जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

 




जिल्हा दक्षता समितीची बैठक संपन्न

अमरावती , दि. 27: अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ अंतर्गत जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीची सभा निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.विवेक घोडके यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज संपन्न झाली. यावेळी शहरी व ग्रामीण विभागात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यातंर्गत घडलेले गुन्हे तसेच प्रलंबित गुन्ह्यांबाबत चर्चा करण्यात आली. 

सहायक पोलीस आयुक्त अर्जुन ठोसरे, गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक  तपन कोल्हे, पोलीस निरीक्षक पी. पाचकवडे, शासकीय अभियोक्ता गजानन खिल्लारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते .

 दक्षता समितीच्या बैठकीमध्ये माहे एप्रिल २०२३ पर्यंतच्या प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा आढावा घेण्यात आला . तसेच माहे मे मध्ये एकुण 8 प्रकरणे दाखल झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. न्यायालयात प्रलंबित प्रकरणे, अर्थसहाय्यासाठी प्रलंबित प्रकरणे तसेच जिल्हा दक्षता समितीवर अशासकीय सदस्य घेण्याबाबतचा आढावा  यावेळी घेण्यात आला.

             निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. घोडके यांनी प्रलंबित प्रकरणांचा लवकरात लवकर तपास पूर्ण करून दोषारोप न्यायालयात दाखल करण्याबाबत संबंधितांना सूचना दिली. तसेच निधी अभावी प्रलंबित प्रकरणांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्याबाबत निर्देश दिले.

000000

--

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...