Posts

Showing posts from October, 2017
अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून जिल्हा दौरा अमरावती, दि. 31 : अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्या दि. 1 पासून दि. 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा दौ-यावर आहे. या दौ-यात अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून राबविण्यात येणा-या योजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे. समितीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 1 नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांबाबत अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक कार्यालय, शिवाजी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आदी ठिकाणी समितीचे सदस्य जाऊन तेथील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी आदी बाबींची माहिती घेतील. दि. 2 नोव्हेंबरला समितीचे सदस्य प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा-या जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा, वसतिगृहे व यंत्रणानिहाय कामांना भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतील. दि. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अमरावती म
Image
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचा ‘एकता दौड’मध्ये सहभाग        राष्ट्रीय एकतेसाठी धावले अमरावतीकर अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आज शहरात शासकीय कार्यालयांसह विविध संस्था- संघटनांतर्फे एकता दौड काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनीही विविध ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला.    सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने   ‘ रन फॉर युनिटी ’  हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते. राजकमल चौक येथून श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी  दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला. देशाची अखंडता राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच आज त्यांना अभिवादन म्हणून संपूर्ण देशभरात  ‘ रन फॉर युनिटी ’  दौड आयोजित केली जात आहे.   देशाची अखंडता, एकात्मता चिरंतन आहे, असाच संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जात आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले. जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फेही एकता दौ
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त शपथ अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन कार्यक्रम झाला. राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त सर्व अधिकारी- कर्मचा-यांनी राष्ट्रीय एकात्मतेची शपथ यावेळी घेतली. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. उपजिल्हाधिकारी गजेंद्र बावणे व इतर कर्मचा-यांनीही महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.                              00000
Image
एकता दौड’मध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आज एकता दौड काढण्यात आली. शहरांतील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला. विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीश पहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. क्रीडा अधिकारी रमेश बुंदिले, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.    00000
Image
‘ दीपावली मिलना’निमित्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद सामाजिक सलोख्याचे प्रभावी माध्यम -             पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती, दि. 30 : ‘दीपावली मिलन’ हे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधत समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी येथे केले.  श्री. पोटे-पाटील यांच्या निवासस्थानी  दीपावलीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी दीपावलीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार अनिल बोंडे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. समाजात विधायक कार्य करणा-या कार्यकर्ते, नागरिकांचा गौरव यावेळी करण्यात आला.  यावेळी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले हो
Image
सहकारातून सामाजिक बांधीलकी जोपासावी -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती    28:-   सहकार चळवळीचे महाराष्ट्राच्या विकासात मोठे योगदान आहे. सहकाराची व्याप्ती अधिक वाढवत गरजू वर्गासाठी विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधीलकी जोपासावी, असे आवाहन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी आज येथे केले.                 सहकारी भारतीचे संस्थापक लक्ष्मणराव इनामदार यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे प्रशिक्षण व अधिवेशन अभियंताभवनात घेण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, आमदार सुनील देशमुख, सहकारी भारतीचे विदर्भ प्रदेशाध्यक्ष आशिष चौबीसा, दादारावजी भडके, निवेदिता दिघडे आदी उपस्थित होते. श्री. पोटे- पाटील म्हणाले की, राज्यात सहकार क्षेत्राची व्याप्ती सर्वदूर आहे. या क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी समाजातील सर्वसामान्य    नागरिकांशी जनसंपर्क वाढवत सहकारी बँका व सोसायट्यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविले पाहिजेत. याच भावनेतून मी पंडित दीनदयाल उपाध्याय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम लोकांना आवाहन करत असतो. या माध्यमातून
Image
                                                                                  मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी ,  बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण                                               - पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील *  भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी  2  कोटीचा निधी प्राप्त अमरावती  27-  भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या  2  कोटींच्या निधीतून करण्यात येत आहे .  काम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉ .  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईल ,  अशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे - पाटील यांनी दिली . शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केली .  यावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवार ,  बौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री . आकोडे ,  तायडे ,  शहारे ,  पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर ,  नगरसेवक दिनेश बुब ,  आर्कीटेक्चर श्री .  खंडारकर ,  कंत्राटदार श्री .  अग्रवाल आदी
Image
  डिजीटल ग्राम हरिसालमधील सुविधांबाबत जिल्हाधिका-यांकडून आढावा सुविधांत वाढ व्हावी                 जिल्हाधिकारी अभिजित बांगर अमरावती, दि. 27 : देशातील पहिले ‘डिजीटल ग्राम’ हरिसाल येथे अद्ययावत व्यायामशाळा उभारण्यासह स्वच्छता व इतर विविध सुविधांत वाढ करण्याबाबत प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले. हरिसाल येथील विविध विकासकामांबाबत आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. टाकसाळे, आरोग्य अधिकारी श्री. आसोले, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव, बँक ऑफ महाराष्ट्रचे प्रफुल्ल कणाके, ‘खोज’च्या पौर्णिमा उपाध्याय, ‘मायक्रोसॉफ्ट’च्या श्रिया रंगराजन व गणेश येवले आदी उपस्थित होते.                श्री. बांगर म्हणाले की, हरिसालमध्ये बँक ऑफ महाराष्ट्रच्या माध्यमातून 885 बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक ग्राहकांना रुपे कार्डही देण्यात आले आहे. गावातील उर्वरीत नागरिकांचीही खाती उघडावीत. तसेच, एटीएम वापराबाबत कार्यशाळा घ्यावी.       रोजगार हमी योजनेच्या कामांबाबत स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात यावा. शिबिर घ
Image
माध्यमांचा अंकूश महत्वाचा                                                       - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  अमरावती, दि. 23- लोकशाहीतील सरकार निरंकुश असणे योग्य ठरत नाही, म्हणूनच माध्यमांच्या अंकुशाचे महत्त्व मोठे आहे. सरकार माध्यमांना सर्वोतोपरी सहकार्य करत असले तरी त्यामागे निरपेक्ष कर्तव्याची भावना आहे. सरकार सरकारचे कर्तव्य करीत आहे. माध्यमांनी माध्यमांचे कर्तव्य बजावत राहावे. प्रत्येक कर्तव्यामागे स्वहिताची नव्हे तर समाजहिताची आणि देशहिताची भावना असली पाहिजे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.            अमरावती येथे उभारण्यात आलेल्या पत्रकार भवनाचे उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यानंतर अमरावती जिल्हा मराठी पत्रकार संघाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक सभागृह येथे आयोजित पत्रकार भवन लोकार्पण सोहळयाच्या कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून गृह राज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील, खासदार आनंदराव अडसुळ, आमदार सर्वश्री डॉ. सुनिल देशमुख,  डॉ. अनिल  बोंडे, यशोमती ठा
Image
अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक                                      - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमरावती , दि . 23 :  अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबतच्या मागणी संदर्भात निश्चितच गांभिर्याने विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रणजित पाटील, आमदार अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे पदाधिकारी, जि.प. सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सादर केले.             अमरावतीला इर्विन, डफरीन, सुपरस्पेशालिटी व टि.बी हॉस्पीटल अशी चार शासकीय हॉस्पीटल आहेत. या चारही हॉस्पीटल
Image
शरद पवार राजकारणातील सुसंस्कृत, संवेदनशील व्यक्तिमत्व -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस * अमरावती येथे सर्वपक्षीय गौरव समारंभ अमरावती, दि. 23 : शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. सर्वच क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविला, असा दूरदृष्टीचा नेता घडायला मोठा कालावधी लागतो, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या संसदीय कार्याचा गौरव केला. खासदार शरद पवार यांच्या संसदीय कार्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त येथील शिवाजी शिक्षण संस्थेच्या मैदानावर सर्वपक्षीय नागरी सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्‍यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, गृहराज्यमंत्री रणजीत पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार आनंदराव अडसूळ, कमलताई गवई, आमदार सुनिल देशमुख, रवी राणा, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे आदी यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विकासासाठी पक्षाच्या पलीकडे जाऊन निर्णय घेणार
Image
दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती प्रारंभ शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन जिल्ह्यात कर्जमुक्ती प्रारंभ कल्याणकारी योजनांतून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट                        -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील अमरावती ,  दि . 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने  दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीचा शब्द पूर्ण केला आहे. कर्जमुक्तीसह जलयुक्त शिवार, गटशेती आदी योजनांव्दारे  ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र, वस्त्र, शाल-श्रीफळ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  नियोजन भवनातील या कार्यक्रमास आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते. श्री पोटे-पाटील म्हणाले की, आजच्या दिवसाची सुवर्णाक्षरांत नोंद घेतली जाईल. कर्जमुक्तीचा ऐतिह
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात  माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन        अमरावती, दि. 15: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.           याप्रसंगी आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तसेच अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.  डॉ. कलाम यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत . ००००
Image
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या कामांचा जिल्हाधिका-यांकडून आढावा   योजनेच्या कामांना गती द्यावी -           जिल्हाधिकारी अभिजित बांगर अमरावती, दि. 13 : लहरी हवामानामुळे शेती क्षेत्रावर होणारे परिणाम व विविध समस्यांवर मात करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील खारपाणपट्ट्यातील 356 गावांसह एकूण 532 गावे या योजनेत समाविष्ट असून, कृषी विभागाने या कामाला गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी आज येथे दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या जिल्ह्यात करावयाच्या कामांच्या नियोजनाबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी सत्यजीत ठोसरे यांच्यासह अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.            श्री. बांगर म्हणाले की, या प्रकल्पातून शेती समस्येच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.    शेतक-यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी सक्षम करणे व शेती आर्थिकदृष्ट्या किफायतशीर होण्यासाठी प्रयत्न करणे