पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांचा ‘एकता दौड’मध्ये सहभाग
       राष्ट्रीय एकतेसाठी धावले अमरावतीकर
अमरावती, दि. 31 : राष्ट्रीय एकात्मता दिनानिमित्त आज शहरात शासकीय कार्यालयांसह विविध संस्था- संघटनांतर्फे एकता दौड काढण्यात आली. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनीही विविध ठिकाणी उपस्थित राहून या उपक्रमात सहभाग घेतला.
  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस निमित्ताने रन फॉर युनिटी’ हा उपक्रम जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये आबालवृद्ध उत्साहाने सहभागी झाले होते. राजकमल चौक येथून श्री. पोटे- पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी  दाखवून एकता दौडचा शुभारंभ करण्यात आला.
देशाची अखंडता राखण्यात सरदार वल्लभभाई पटेल यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळेच आज त्यांना अभिवादन म्हणून संपूर्ण देशभरात रन फॉर युनिटी’ दौड आयोजित केली जात आहे.  देशाची अखंडता, एकात्मता चिरंतन आहे, असाच संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून दिला जात आहे, असे श्री. पोटे- पाटील यांनी सांगितले.
जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फेही एकता दौड काढण्यात आली. शहरांतील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीश पहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. क्रीडा अधिकारी रमेश बुंदिले, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.  
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती