दिवाळीपूर्वी कर्जमुक्ती प्रारंभ

शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन जिल्ह्यात कर्जमुक्ती प्रारंभ

कल्याणकारी योजनांतून ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट
                       -पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावतीदि. 18 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने  दिवाळीपूर्वी कर्जमुक्तीचा शब्द पूर्ण केला आहे. कर्जमुक्तीसह जलयुक्त शिवार, गटशेती आदी योजनांव्दारे  ग्रामीण महाराष्ट्राचा कायापालट होत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील यांनी आज येथे केले.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत कर्जमुक्ती प्रारंभ कार्यक्रमात जिल्ह्यातील 32 शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र, वस्त्र, शाल-श्रीफळ देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात आले.  नियोजन भवनातील या कार्यक्रमास आमदार सुनील देशमुख, आमदार अनिल बोंडे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.
श्री पोटे-पाटील म्हणाले की, आजच्या दिवसाची सुवर्णाक्षरांत नोंद घेतली जाईल. कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय दिवाळीपूर्वी अंमलात आला आहे.  कर्जमुक्तीसह विविध कल्याणकारी योजनांतून शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. ऑनलाईन कर्जमाफीतून प्रक्रिया निर्दोष करुन खऱ्या गरजूंना लाभ देण्यात आला. अधिकाधिक शेतकऱ्यांच्या समावेशासाठी अल्प भूधारकांची अट काढण्यात आली. त्याचा लाभ होऊन ही योजना विस्तृत झाली. हा ऐतिहासिक निर्णय आहे.
आमदार श्री. बोंडे म्हणाले की, ही कर्जमाफी खऱ्या गरजूंची कर्जमुक्ती आहे. कर्जमुक्तीचा हा निर्णय शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतकरी बांधवांच्या कल्याणासाठी महत्वाचा ठरला, अशी भावना अनेक शेतकरी बांधवांनी या कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केली.
 यावेळी गौरविण्यात आलेल्या शेतकरी बांधवांची नावे पुढीलप्रमाणे : विजय श्रीरामजी आखरे (गोराळा ता. मोर्शी), मारोती गुलाबराव पांडे, बबन यशवंत सावरकर (नेरपिंगळाई, ता. मोर्शी), रमेश माणिकराव मोहोड, मुरलीधर शंकरराव मोहोड (माधान ता. चांदुरबाजार), पुरणजी आकाराम तायडे, श्रीमती नर्मदा ओंकारराव गांजरे (गणोजा देवी, ता. भातकुली), गजानन तुळशिराम शिरसाट (गौरखेडा, ता. भातकुली), श्रीमती शकुंतला प्रल्हादराव इंगळे (कोकर्डा, ता. अंजनगाव), श्रीमती लिलाबाई नाजुकराव काळपांडे(जवळा, ता. अंजनगाव), सुभाष अर्जुन काटकर (हरीजन खासपूर, अंजनगाव), यशवंत पुंडलीकराव दातीर, राजेंद्र शंकरराव शेवतकर (अंजनगाव बारी, ता. अमरावती), गोपाल कृष्णराव डांगे (धानोरा मा. ता. चांदुर रेल्वे), गजानन पांडुरंग अनासाने, श्रीमती कौशल्या नागारेाव वाढोणकर (आमला वि. ता. चांदुर रेल्वे), अनिल कृष्णराव भोगे (जवगाव आर्वी, ता. धामणगाव), निवृत्ती माधवराव मोलोदे (सोनेगाव, ता.धामणगाव ), सिदार्थ देविदास पाटील (तरोडा, ता. धामणगाव), सुरेंद्र  सुधाकर बोके (वरखेड, ता. तिवसा), व्दारकाबाई महादेवराव तिखे (शिरजगाव, ता. तिवसा), गोवर्धन रामराव बेलोकार (धोतरखेडा, ता. अचलपूर), केशवराव वासुदेवराव तत्ते (बोर्डी, ता. अचलपूर), बाळु तुकाराम सावरकर (बोपापुर, ता. अचलपूर), बाजीराव पायरुजी तायडे (नाचोना, ता. दर्यापूर), प्रल्हाद एकोजी गावंडे (जैनपुर, ता. दर्यापूर), वकीला बबन गावंडे (लोतवाडा, ता. दर्यापूर), मारोती लुनबाजी चामलोटे, रामकृष्ण विठ्ठल भुसारी (वाठोडा, ता. वरुड), विलास मनोहर चौधरी, भागवत राजाराम भड (गोरेगाव, ता. वरुड), हरीदास पुरुषोत्तम भड (करजगाव, ता. वरुड)
00000



Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती