अमरावतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
स्थापन करण्यासाठी शासन सकारात्मक
                                     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमरावती, दि. 23 :  अमरावती येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याबाबतच्या मागणी संदर्भात निश्चितच गांभिर्याने विचार करु, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.
येथील ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील, आमदार सुनील देशमुख, आमदार रणजित पाटील, आमदार अनिल बोंडे, महापौर संजय नरवणे तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीचे पदाधिकारी, जि.प. सदस्य यावेळी उपस्थित होते. प्रारंभी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कृती समितीच्या पदाधिकारी यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्र स्थापन करण्याविषयीचे निवेदन मुख्यमंत्री महोदयांना सादर केले.
            अमरावतीला इर्विन, डफरीन, सुपरस्पेशालिटी व टि.बी हॉस्पीटल अशी चार शासकीय हॉस्पीटल आहेत. या चारही हॉस्पीटलमध्ये 500 पेक्षा जास्त खाटा उपलब्ध आहेत. मेळघाटातील कुपोषण, शेतकरी आत्महत्या तसेच जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेता अमरावती येथे शासकीय महाविद्यालय स्थापन होणे आवश्यक आहे. अमरावती शहरापासून 6-7 कि.मी. अंतरावर केंद्रीय विद्यापीठासाठी शासनाची जमीन उपलब्ध आहे. त्यातील 100 एकर जागा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व अनुसंधान केंद्राला देता येईल. महाविद्यालयाच्या स्थापनेतून जिल्ह्यातील गोर-गरीब रुग्णांची सेवा होईल. ग्रामीण व शहरी भागातून याबाबत मागणी असून सुमारे 100-150 संघटनांनी यासाठी पांठीबा दिला असल्याची माहिती कृती समितीचे संयोजन किरण पातुरकर यांनी मुख्यमंत्री महोदयांना दिली.
            यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, मनपा आयुक्त हेमंत पवार, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, पंजाबराव देशमुख रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्मामाकर सोमवंशी उपस्थित होते.

*****


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती