अनुसूचित जमाती कल्याण समितीचा आजपासून जिल्हा दौरा
अमरावती, दि. 31 : अनुसूचित जमाती कल्याण समिती उद्या दि. 1 पासून दि. 3 नोव्हेंबरपर्यंत जिल्हा दौ-यावर आहे. या दौ-यात अनुसूचित जमातीसाठी जिल्ह्यातील विविध यंत्रणांकडून राबविण्यात येणा-या योजनांबाबत आढावा घेतला जाणार आहे.
समितीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे : दि. 1 नोव्हेंबरला शासकीय विश्रामगृह येथे जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या कल्याणकारी योजनांबाबत अनौपचारिक चर्चा होईल. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र वीज वितरण कंपनी, पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक कार्यालय, शिवाजी शिक्षण संस्था, जिल्हा परिषद व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आदी ठिकाणी समितीचे सदस्य जाऊन तेथील अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष, जात पडताळणी आदी बाबींची माहिती घेतील.
दि. 2 नोव्हेंबरला समितीचे सदस्य प्रकल्प कार्यालयांतर्गत येणा-या जिल्ह्यातील विविध आश्रमशाळा, वसतिगृहे व यंत्रणानिहाय कामांना भेटी देऊन योजनांच्या अंमलबजावणीबाबत माहिती घेतील.
दि. 3 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजता अमरावती महापालिकेत अनुसूचित जमातीच्या पदांची भरती, बढती, आरक्षण, अनुशेष व जात पडताळणीबाबत चर्चा होईल.  त्यानंतर दु. 2 वाजता जिल्ह्यातील विविध यंत्रणांना दिलेल्या भेटीच्या अनुषंगाने आढळलेल्या त्रुटी व उपाययोजना याबाबत सर्व अधिका-यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे.
                   000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती