Monday, October 30, 2017

दीपावली मिलना’निमित्त पालकमंत्र्यांचा नागरिकांशी संवाद
सामाजिक सलोख्याचे प्रभावी माध्यम
-           पालकमंत्री प्रवीण पोटे-पाटील

अमरावती, दि. 30 : ‘दीपावली मिलन’ हे समाजातील विविध स्तरांतील नागरिकांशी संवाद साधत समाजात सलोख्याचे वातावरण निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी येथे केले. 
श्री. पोटे-पाटील यांच्या निवासस्थानी  दीपावलीनिमित्त स्नेहमीलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्र्यांनी दीपावलीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या. आमदार अनिल बोंडे यांच्यासह जिल्हाभरातील अनेक पदाधिकारी, अधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर व नागरिक उपस्थित होते. समाजात विधायक कार्य करणा-या कार्यकर्ते, नागरिकांचा गौरव यावेळी करण्यात आला.  यावेळी स्नेहभोजनाचे आयोजनही करण्यात आले हो

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...