Friday, October 27, 2017


                                                                                 मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भिमटेकडी, बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचे लोकार्पण
                                             -पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील
भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी कोटीचा निधी प्राप्त

अमरावती 27- भिमटेकडी व शिवटेकडींचे सौंदर्यीकरण पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांच्या प्रयत्नाने मिळालेल्या कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेकाम पूर्ण झाल्यानंतर भिमटेकडी स्मारक व डॉबाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हस्ते करण्यात येईलअशी माहिती पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी दिली.
शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही स्थळांची पाहणी पालकमंत्री महोदयांनी आज केलीयावेळी त्यांच्या समवेत मनपा आयुक्त हेमंत पवारबौध्द धम्म प्रचार समितीचे पदाधिकारी श्री.आकोडेतायडेशहारेपालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकरनगरसेवक दिनेश बुबआर्कीटेक्चर श्रीखंडारकरकंत्राटदार श्रीअग्रवाल आदी उपस्थित होते.
            प्रारंभी पालकमंत्री महोदय व इतर मान्यवरांनी भिमटेकडीला भेट दिलीतेथील परिसराचीबांधकामाची पाहणी त्यांनी केलीसदर वास्तुचे सद्यस्थितीत 75 टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहिती मनपा आयुक्त यांनी दिली. भिमटेकडीची उर्वरित स्थापत्य कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीअसे आदेश त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिलेभिमटेकडी येथील वास्तू तयार झाल्यावर या पवित्र स्थळाची पवित्रता कायम राहील यासाठी संस्थेने व नागरिकांनी दक्षता घ्यावीहा परिसर रमनिय व सुंदर होण्यासाठी मोठया प्रमाणात झाडे लावावीतविद्यार्थ्यांना या स्मारकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळण्यासाठी नवीन उपक्रम राबवावाअसेही त्यांनी यावेळी सांगितले
त्यानंतर पालकमंत्री महोदयांनी शिवटेकडीला भेट दिली. शिवटेकडीच्या परिसरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची व परिसराची पाहणी त्यांनी केलीपरिसरातील जलशुध्दीकरण पाण्याच्या टाकीचे काम तातडीने पूर्ण करावेअसे आदेश त्यांनी यावेळी दिलेभिमटेकडी आणि शिवटेकडीच्या सौंदर्यीकरणासाठी तसेच आवश्यक सोयी-सुविधांकरीता आराखडा तयार करण्यात यावाअशा सूचनाही त्यांनी मनपा प्रशासनाला दिल्याशहर सौंदर्यीकरणासाठी निधीची कमतरता भासू देणार नाहीअसेही त्यांनी यावेळी सांगितले
पालकमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी मागील वर्षी भिमटेकडीची पाहणी केली होतीत्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे वेळोवेळी भिमटेकडी व शिवटेकडी सौंदर्यीकरणासाठी निधी मिळण्याबाबत पाठपुरावा केला होतात्यांच्या या पाठपुराव्यामुळे राज्य शासनाकडून शहरातील भिमटेकडी व शिवटेकडी या दोन्ही पवित्र स्थळांच्या विकासाकरीता कोटी 42 लाख रुपये निधी 11 ऑक्टोंबर रोजी मंजूर झाला आहे.सदर निधी महानगरपालिका प्रशासनाकडे वर्ग करण्यात आला असून प्राप्त निधीतून दोन्ही पर्यटन स्थळांचा विकास करण्यात येईलया दोन्ही पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी शासनाकडून कोटी 57लाख रुपयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली होतीत्यापैकी टप्प्याने टप्प्याने हा निधी मनपा प्रशासनाला मिळाला आहे.
******



No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...