Sunday, October 15, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
 माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अभिवादन

      अमरावती, दि. 15: भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांनी  त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
          याप्रसंगी आमदार बच्चू कडू, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे, तसेच अधिकारी-कर्मचारी यांनीही पुष्प वाहून डॉ. कलाम यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. डॉ. कलाम यांचा जन्मदिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जात आहे. त्यानिमित्त राज्य शासनातर्फे विविध कार्यक्रम राबविले जात आहेत.
००००

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...