मध्यवर्ती कारागृहात बंदिजनांसाठी आजचा दिवस वाचनाचा

अमरावती, दि. 13 :  थोर शास्त्रज्ञ व माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलामांपासून ते विविध क्षेत्रांत यश मिळविणा-या व्यक्तींची प्रेरणादायी पुस्तके आज बंदिजनांना वाचायला मिळाली. जिल्हा ग्रंथालयातर्फे येथील मध्यवर्ती कारागृहात बंदिजनांसाठी वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
 भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी दि. 15 ऑक्टोबरला वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. यादिवशी जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांत ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात म्हणून हा कार्यक्रम झाला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोविंद कासट, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बन्सोड, वरिष्ठ तुरुंगाधिकारी पांडुरंग भुसारे आदी यावेळी उपस्थित होते.
 वाचन हे व्यक्तिमत्व विकासासह सकारात्मक परिवर्तन घडवते. त्यामुळे बंदीजनांनी अधिकाधिक पुस्तके वाचावीत, असे आवाहन श्री. कासट यांनी यावेळी केले. श्री. कासट यांनी यावेळी कारागृहातील ग्रंथालयासाठी  स्वत:कडून 25 वेगवेगळ्या पुस्तकांच्या 2 प्रती भेट दिल्या.
  सर्व शासकीय व शासनमान्य ग्रंथालयांनी 15 ऑक्टोबरला ग्रंथप्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, अशी माहिती श्री. बन्सोड यांनी दिली.  भूषण कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. श्री. कांबळे यांनी आभार मानले.




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती