मोटार दावा प्राधिकरणाकडील प्रलंबित ठेवींबाबत संबंधितांनी संपर्क साधावा
-प्राधिकरणाचे आवाहन

अमरावती, दि. 12 : मोटार अपघात दावा प्राधिकरणाच्या आदेशाने विविध अपघात प्रकरणांत अर्जदारांना प्रदान करावयाच्या रकमेच्या मुदत ठेवी करण्यात आल्या. तथापि, काही प्रकरणांतील अर्जदार त्यांच्या पत्त्यावर राहत नसल्याने ठेवी प्रलंबित आहेत. अशा प्रलंबित ठेवींबाबत संबंधितांनी तत्काळ संपर्क साधण्याचे आवाहन प्राधिकरणाचे सदस्य तथा जिल्हा न्यायाधीश ज्ञा. वा. मोडक यांनी केले आहे.
          याप्रकरणी संबंधित अर्जदारांनी किंवा त्यांच्या वारसदारांनी कागदपत्रांसह हजर राहावे अन्यथा रक्कम सरकारजमा करण्यात येईल, असेही कळविण्यात आले आहे.
संबंधित अर्जदारांची नावे व पत्ता : कुशल व आरती पारेख (लक्ष्मीनगर, नागपूर), मंगलाताई जांभेकर (श्यामनगर, अमरावती), शेख मुन्नाबी मोहम्मद (अकोली जि. अहमदनगर), भुखन साहू (जरहमकाका जि. राजनांदगाव), आबेदअली वली अहसान हुसैल वली (कामठी रो. नागपुर), नथ्थुसिंग राजपूत (हिवरखेडा, मोर्शी), फुलवती जयस्वाल (चिखली, बुलढाणा), महंत अमरदास बाबा (पंचायती आखाडा अमरावती), महेफुजा अमीम, (कुसुमकोट धारणी), संजय घाटोळ (अर्जुन नगर अमरावती), मंगेश कदम (चिंचवड पूणे), अरुणा वानखडे (कांरजा लाड), मोहम्मद युसुफ शेख अहमद(अमरावती), विजय उईके (पोरगव्हान मोर्शी), जोहराबी शेख अजीज (पोहराबंदी अमरावती), सुमित्राबाई चोरे (पिंपळखुटा मोर्शी), रत्नाबाई वानरे (अंबाळा मोर्शी), प्रभाकर ढोले (रुख्मीणीनगर अमरावती), देवेंद्रसिंह ठाकुर (लसनापूर भातकुली), सुंदरीदेवी कुमावत (झडाली ता. थोज जि. सिकर राजस्थान), छाया सुर्यवंशी (दुर्गाचौक मंगरुळपीर)

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती