वृत्त क्र.678                                                                                              दिनांक  12-102017
जिल्ह्यातील रेती स्थळांच्या लिलावाची निविदा प्रक्रिया 16 पासून
          अमरावती, दि. 12 : जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील 105 रेती स्थळांची लिलाव प्रक्रिया ‘ई-निविदा-ई-लिलाव’ (प‍हिली वेळ) ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. 16 ऑक्टोबरपासून सुरु होत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने कळवली आहे. ‘ई-निविदा-ई-लिलाव’बाबतचा संपूर्ण तपशील https://amravatico.abcprocure.com या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
रेतीघाटासंबंधीची विस्तृत माहिती या संकेतस्थळासह amravati.nic.in या संकेतस्थळावरही मिळू शकेल. त्याचप्रमाणे, जिल्हा‍धिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय तसेच तहसील कार्यालयातही ही माहिती मिळेल.
          प्रक्रियेत भाग घेण्यापूर्वी नव्याने नोंदणी करणे तसेच डिजीटल सर्टीफिकेट काढणे आवश्यक आहे. ई-निविदाधारक तसेच लिलावधारकाकडे पॅन कार्ड, जीएसटी रजिस्ट्रेशन (जीएसटीन कार्ड) असणे आवश्यक आहे . त्याशिवाय रेती ई-निविदा प्रक्रियेत भाग घेता येणार नाही, अशी माहिती अपर जिल्हाधिकारी यांनी कळविली आहे.  

00000

वृत्त क्र.679                                                                                              दिनांक  12-102017

गाडगेनगरात 27 ला रक्तदान व अवयवदान शिबिर

अमरावती, 12: रक्तदान व अवयवदानाविषयी जनजागृतीसाठी जिल्हा रुग्णालयातर्फे जिल्ह्यात मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात येते. याच उपक्रमात राजमुद्रा मित्रपरिवारातर्फे रक्तदान व अवयवदान शिबिर दि. 27 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता गाडगेनगरातील संत गाडगेबाबा समाधी मंदिर या ठिकाणी आयोजित केले आहे.
जिल्हा रुग्णालयातील समुपदेशक उद्धव जुकरे हे यावेळी अवयवदानाविषयी मार्गदर्शन करतील. बडनेरा येथील संत गाडगेबाबा रक्तपेढीचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे.
00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती