Friday, April 13, 2018

'जय महाराष्ट्रकार्यक्रमात
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले

मुंबईदि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 व्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत उद्या शुक्रवार दि. 13 एप्रिल रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक युवराज मोहिते यांनी ही मुलाखत घेतली आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 127 जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रमइंदू मिलच्या कामकाजाची सद्य:स्थितीसमता प्रतिष्ठानची भूमिकाव्यसनमुक्ती संत साहित्य संमेलन, बौद्ध समाजासाठी व आंतरजातीय विवाहासाठी स्वतंत्र विवाह कायदापाली भाषेचे स्वतंत्र विद्यापीठ तसेच वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या नवीन योजना आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी जय महाराष्ट्र कार्यक्रमात दिली आहे.
००००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...