आरोग्य क्षेत्रातील एनक्युएएस मानांकनात महाराष्ट्र देशात अव्वल
                      राज्याला सर्वात जास्त ३० राष्ट्रीय पुरस्कार     










नवी दिल्ली दि. 20 : महाराष्ट्रातील ३० आरोग्य संस्थांनी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने ठरवून दिलेल्या राष्ट्रीय गुणात्मक आश्वासक मानकात (एनक्युएएस) बाजी मारली असून यात पुणे जिल्हयातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्यकेंद्राचा समावेश.केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांच्या हस्ते आज हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.     

येथील डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाच्या पीजीआयएमईआर सभागृहात आज केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्यावतीने आयोजित सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील गुणवत्ताविषयावरील राष्ट्रीय परिषदेत या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रीय आरोग्य प्रणाली संसाधन केंद्राच्या (एनएचएसआरसी) कार्यकारी संचालक डॉ. रजनी देव, डॉ. राममनोहर लोहिया रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.के.तिवारी  यावेळी मंचावर उपस्थित होते.

केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या एनक्युएएस मानक मिळविणा-या देशातील विविध राज्यांतील आरोग्य केंद्र व रुग्णालयांना यावेळी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. या सोहळयात सर्वात जास्त ३० पुरस्कार पटकविणारे महाराष्ट्र राज्य हे देशात प्रथम ठरले. राज्यातील २८ प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागपूर येथील महिला रूग्णालय व उस्मानाबाद येथील ग्रामीण रूग्णालयाचा यावेळी सन्मान करण्यात आला.

                         १० प्राथमिक आरोग्य केंद्रासह पुणे जिल्हा राज्यात अव्वल
       राज्यातून पुणे जिल्हयातील सर्वात जास्त १० प्राथमिक आरोग्य केंद्राना यावेळी सन्मानित करण्यात आले. जिल्हयातील मान, वाघोली, सावरगाव, मोरगाव, लोनीकाळभोर, काटेवाडी, उरळीकांचन, टाकळेहाजी, ताकवे, आणि खाडकला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना यावेळी सन्मानीत करण्यात आले. संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रतिनिधींसह तालुक्का गुणवत्ता आश्वासक समन्वयक डॉ. अजित कारंजकर यांनी हे पुरस्कार स्वीकारले.
        यासोबतच नागपूर जिल्हयातील धापेवाडा, मकरधोकडा आणि टाकळघाट या तीन प्राथमिक केंद्रांना आणि ठाणे जिल्हयातील धासई, दाभाड आणि दिवांजूर या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना सन्मानीत करण्यात आले. कोल्हापूर जिल्हयातील निवडे आणि चिखली, अकोला जिल्हयातील हिवरखेड आणि मळसूर, औरंगाबाद जिल्हयातील आळंद आणि गाणोरी या प्रत्येकी २ प्राथमिक आरोग्य केंद्राना यावेळी सन्मानीत करण्यातआले.तसेच, पालघर जिल्हयातील घोलवड, जालना जिल्हयातील हसनाबाद,अहमदनगर जिल्हयातील आढळगाव, वर्धा जिल्हयातील साहुर ,धुळे जिल्हयातील होलनाथे आणि बुलडाणा जिल्हयातील हातेडी या प्रत्येकी एका प्राथमिक केंद्राला सन्मानीत करण्यात आले.

                 राज्यातील महिला रुग्णालय व ग्रामीण रूग्णालयाचाही सन्मान
नागपूर येथील डागा मेमोरीयल महिला रूग्णालय आणि उस्मानाबाद जिल्हयातील सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रूग्णालयाचाही यावेळी सन्मान करण्यात आला.

 महाराष्ट्रात जास्तीत-जास्त आरोग्य संस्थांना एनक्युएएस मानांकन मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कार्य करणारे महाराष्ट्र राज्य गुणवत्ता आश्वासक समितीचे राज्य समन्वय अधिकारी डॉ. रामजी आडकेकर, राज्य कार्यक्रम अधिकारी डॉ. मयुरी संखे व अनामिका निगवाल यांचाही या पुरस्कार सोहळयात प्रातिनिधीक सन्मान करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती