Monday, April 2, 2018

राज्यभरात 13 लाख क्विंटलहून अधिक तूर खरेदी
सुभाष देशमुख
मुंबई, दि. 2 : राज्यात १ फेब्रुवारीपासून आधारभूत दराने तूर खरेदीला सुरुवात झाली आहे. आजपर्यंत  १६७  तूर केंद्रावर एक लाख १६ हजार २४५ शेतकऱ्यांची १३ लाख ९९ हजार १५१ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली असल्याची माहिती सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी आज दिली.
तूर खरेदीचा काळ तीन महिने असून आतापर्यंत ४ लाख ३ हजार ३७६ शेतकऱ्यांनी तूर खरेदीसाठी नोंदणी केली आहे. सध्या कार्यरत खरेदी केंद्रांशिवायही शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व जिल्हाधिकाऱ्यांच्या शिफारसीनुसार केंद्रे सुरू करण्यात येणार आहेतअसेही पणन मंत्री श्री. देशमुख यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...