बाळासाहेब पवार म्हणजे सहकारशिक्षणातील
सेवाभावी वृत्तीने काम करणारे व्यक्तिमत्व
-         मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
औरंगाबाददि. 21 (जिमाका) - नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचे वाचन केल्यावर बाळासाहेब पवार हे सहकार आणि शिक्षण क्षेत्रातील सेवाभावी वृत्तीने काम करणारे राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्व होतंत्यांच्या या काम करण्याच्या पद्धतीचा अवलंब अनेकांनी करावा असं ते व्यक्तिमत्व होतंअसे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
मराठवाड्यातील समाजकारण व राजकारणातील अव्दितीय व्यक्तिमत्व बाळासाहेब पवार यांच्या नीतिधुरंधर या चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते येथील जगतगुरु तुकाराम सभागृह येथे झालात्यावेळी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री सुरेश प्रभूविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील,प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे,  उद्योग मंत्री सुभाष देसाईमाजी अर्थमंत्री जयंत पाटीलखासदार चंद्रकांत खैरेचरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळेप्राध्यापक रा. रं. बोराडेमहापौर नंदकुमार घोडेले हे उपस्थित होते.
सर्वप्रथम मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी मराठवाड्यातील या दिग्गज व्यक्तिमत्वाच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करण्याची संधी मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणालेजरी या व्यक्तिमत्त्वाची आणि त्यांची प्रत्यक्ष भेट होवू शकली नाहीतरी या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून मला हे व्यक्तिमत्व समजले. मराठवाड्यातील विविध आंदोलनांचे दाखले आजही बाळासाहेबांच्या नावाने दिले जातातयातच या व्यक्तीच्या कार्यकर्तृत्वाची उंची लक्षात येते. बाळासाहेब पवारांनी सामाजिक आणि राजकीय वाटचालीत स्वाभिमान जपूनअपयश आले तरी खचून न जाता आपल्या भागातील माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अविश्रांत परिश्रम घेतलेअसे सांगून श्री. फडणवीस यांनी बाळासाहेबांच्या कोणत्याही कामाप्रती त्यांच्या व्रतस्थ स्वभावाचे सर्वांनी अनुकरण करावेअसे आवाहन त्यांनी  केले.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेमुख्यमंत्री कोण असावा या भूमिकेसाठी न्यायरितीनेअभ्यासूवृत्तीने संघर्ष स्वीकारणारेप्रामाणिक तळमळ असणारे हे व्यक्तिमत्व होते. त्यांनी आपल्या वैयक्तिक जीवनात परंपराधार्मिक प्रथा जपल्या आणि हे करताना कुठेही जातीभेदधर्मभेद अंगिकारला नाही. समाजकारणराजकारण करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांनी हा चरित्रग्रंथ जरुर वाचावाअसे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना केले. आणि या चरित्रग्रंथामुळे एका महनीय व्यक्तीचा परिचय झालायाबद्दल लेखकाप्रती आणि या चरित्रग्रंथाशी संबंधित अन्य व्यक्तींविषयी कृतज्ञताही त्यांनी व्यक्त केली.
प्रास्ताविक या चरित्रग्रंथाचे लेखक ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांनी केले. याप्रसंगी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोराडे यांनीही या चरित्रग्रंथाविषयी केलेल्या प्रस्तावनेबाबत मनोगत व्यक्त केले.
या प्रकाशन सोहळयास विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकरबाळासाहेब पवारांचे सुपूत्र मानसिंग पवारमंगलसिंग पवार यांच्यासह औरंगाबादमधील सामाजिक कार्यकर्तेराजकीय दिग्गज,पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याची सुरुवात  वैष्णव जन ते..  या भजनाने झाली तर समारोप पसायदानाने झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. रुपेश मोटे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती