‘लोकराज्य’च्या ‘महामानवाला अभिवादन’विशेषांकाचे
पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या हस्ते प्रकाशन
अमरावती, दि. 8 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘लोकराज्य’च्या ‘महामानवाला अभिवादन’ या  विशेषांकाचे प्रकाशन पालकमंत्री प्रवीण पोटे- पाटील यांच्या हस्ते आज नियोजनभवनात झाले.
          जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, आमदार वीरेंद्र जगताप, आमदार रमेश बुंदिले, जि. प. उपाध्यक्ष दत्ता ढोमणे, जिल्हाधिकारी अभिजित बांगर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री, विभागीय कृषी अधिक्षक अधिकारी श्री. चव्हाळे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी अनिल खर्चान, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील वंचित घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले.  प्रत्येक क्षेत्रात त्यांच्या अतुलनीय कार्याचा ठसा उमटला आहे. लोकराज्यचा ‘महामानवाला अभिवादन’ हा अंक दर्जेदार व संग्राह्य असल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री श्री. पोटे- पाटील यांनी दिली. 
सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. विशेषांकात बाबासाहेबांचे जीवनकार्य व विविध पैलूंवर प्रकाश टाकणारे अनेक मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत.92 पानांच्या या अंकाची किंमत केवळ दहा रुपये असून, तो सर्वत्र उपलब्ध आहे.  
                                                                  00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती