जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 6 (जिमाका) : व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी प्रवेशीत विद्यार्थ्यांनी आपला परिपूर्ण अर्ज तात्काळ सादर करावा, असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती श्रीमती जया राऊत यांनी केले आहे.

 

            ज्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र, वास्तुशास्त्र, हॉटेल मॅनेजमेंट व केटरिंग टेक्नोलॉजी, व्यवस्थापन शास्त्र, एमसीए, कला शिक्षण, वैद्यकीय, कृषी, शिक्षणशास्त्र, बीए, बीएससी-बीएड,एमएड, विधी, फिशरी, शारिरीक शिक्षण, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, फिजिओथेरेपी इत्यादी व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांनी प्रवेश अर्ज करतेवेळी जात पडताळणी प्रमाणपत्र प्रवेश प्रक्रिया नोंदणी अर्जासोबत अपलोड करणे आवश्यक आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज http:barti.maharashtra.gov.in या वेबसाईटवर भरावे. ऑनलाईन अर्जाची प्रिंट, त्यासोबत अर्जदाराचे जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, वडील व आजोबांचे शालेय किंवा महसूली पुरावे, आवश्यक शपथपत्रासह संबंधित महाविद्यालयामार्फत किंवा प्राचार्याच्या सही शिक्याने स्व:त यथाशिघ्र संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र समितीकडे सादर करावा. परिपूर्ण अर्ज दाखल करतांना अर्जदाराने मुळ दस्ताऐवज सोबत आणून दाखवणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज भरण्याचे वेळेअगोदर वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे अनुषंगाने विद्यार्थ्यांनी परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीव्दारे करण्यात आल आहे.

0000000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती