कोरोना प्रतिबंधासाठी मेळघाटात विविध उपाययोजना - सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी


गरोदर माता व बालकांना पूरक आहार, दूधवाटप
विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाधारित उपक्रम
       
 मेळघाटात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या प्रतिबंधासाठी सुसज्ज आरोग्य यंत्रणेसह नागरिकांना लागणा-या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठी धारणी व्हॉलिंटिअर्स नावाचा ग्रुप तयार करण्यात आला असून विद्यार्थ्यांच्या घरबसल्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानाधारित उपक्रम हाती घेण्यात आल्याची माहिती एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली.
धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयाची यंत्रणा सुसज्ज असून, चिखलदरा येथील ग्रामीण रूग्णालयात 2 व धारणी येथील उपजिल्हा रूग्णालयात 3 रुग्णवाहिका सेवा बजावत आहेत, असे सांगून श्रीमती डॉ. सेठी म्हणाल्या की, मेळघाटातील आदिवासी स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी प्रकल्प कार्यालय, उपविभागीय कार्यालय व स्थानिक सेवाभावी सामाजिक संस्था यांचा धारणी व्हॉलिंटिअर्स नावाचा ग्रुप तयार करण्यात आला असून, त्या माध्यमातून गरजू आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, आरोग्यविषयक माहिती व आवश्यक इतर बाबी पुरविण्यात येत आहेत.
त्या पुढे म्हणाल्या की, येथील आठ आश्रमशाळांत शिल्लक असलेला 10 हजार 586 नग सुगंधित टेट्रा पॅक दुधाचा (200 मिली) पुरवठा जवळच्या गावातील अंगणवाडी केंद्रांना करण्यात येत आहे. या दुधाचे वाटप गरोदर माता, स्नतदा माता, लहान मुलांना करण्याचे निर्देश अंगणवाडी सेविकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यवाही सुरू करण्यात आली आहे
सध्या अंगणवाडी व शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी सेवाभावी संस्थांच्या मदतीने तज्ज्ञ शिक्षकांचा समूह बनविण्यात आला असून, त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या साह्याने शिक्षण देण्याचा उपक्रम आकारास येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत महिला लाभार्थी व बालकांना आहार, आहार घटक घरपोच उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याची कार्यवाही लवकर

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती