नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

नांदेडऔरंगाबादजालनालातूरअमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा करण्याबाबत आरोग्यमंत्र्यांची केंद्र शासनाकडे मागणी

मुंबईदि. 10 : राज्यात नांदेडऔरंगाबादजालनालातूरअमरावती या ठिकाणी कोरोना चाचण्यांसाठी परवानगी द्यावीपीपीई उत्पादक कंपन्यांचे प्रमाणिकरण जलदगतीने करावेरॅपीड टेस्ट कधी कराव्यात याबाबत केंद्र सरकारने मार्गदर्शन करतानाच त्यासाठी आवश्यक किटस् ही उपलब्ध करून देण्याची मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज केंद्रीय आरोग्यमंत्री यांच्याकडे केली.
कोरोनाबाबत राज्यांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी विविध राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. राज्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांच्यासह विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्याससाथरोग नियंत्रण समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंके आदी यावेळी उपस्थित होते.
आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले कीमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होते आहे. मुंबईमधील वाढ चिंताजनक असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राज्य शासनामार्फत अधिक प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. कंटेनमेंट सर्वेक्षण कृती योजनेअंतर्गत सुरू असलेल्या विविध बाबींची माहिती यावेळी त्यांनी दिली.
राज्यासाठी आवश्यक असणारे पीपीई किटस्एन 95 मास्क याबाबत केंद्र शासनाकडे मागणी यापूर्वीच नोंदविली असून हे सर्व साहित्य वेळेवर उपलब्ध करून दिल्यास त्याचे वितरण राज्यभरात करणे सोईचे होईलअसे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
देशातराज्यात ज्या पीपीई किटस् उत्पादक कंपन्या आहेत त्यांचे प्रमाणिकरण जलदगतीने करावे जेणेकरून त्यांना उत्पादन करणे शक्य होईलअशी मागणी करतानाच रॅपीड चाचणी कधी करायच्या या बाबतीत केंद्र शासनाकडून मार्गदर्शक सूचनांसोबतच त्यासाठी लागणारे किटस् देखील उपलब्ध करून द्यावेअसे श्री. टोपे यांनी यावेळी सांगितले.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती