मंत्री दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा
*प्रजासत्ताक दिनी करणार ध्वजारोहण
अमरावती, दि. 25 (जिमाका) : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे दि. २५ आणि दि. २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अमरावती येथे आयोजित प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणार आहेत.
दौऱ्यानुसार श्री. भुसे यांचे रविवार, दि. २५ जानेवारी रोजी रात्री १०.१० वाजता बडनेरा येथे आगमन होईल, त्यानंतर ते अमरावती शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम करतील. सोमवार, दि. २६ जानेवारी रोजी सकाळी ९.१५ वाजता अमरावती शहर परेड मैदान, पोलीस मुख्यालय येथे भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहतील. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता ते अमरावतीहून नागपूर विमानतळाकडे रवाना होतील.
000000
No comments:
Post a Comment