विधानपरिषदचे सभापती राम शिंदे
यांचा दौरा
अमरावती, दि. 16 (जिमाका): विधानपरिषदचे सभापती राम शिंदे
यांचा रविवार दि. 18 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या
दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. शिंदे रविवार, 18 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता नागपूर येथून वाहनाने अमरावतीकडे प्रयाण. सकाळी
10.30 वाजता शासकीय विश्रामगृह,अमरावती येथे आगमन व राखीव. सकाळी 10.45 वाजता शासकीय
विश्रामगृह, येथून वाहनाने संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावतीकडे
प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, येथे आगमन
व राज्यस्तरीय धनगर समाज उपवधू-वर परिचय मेळावा कार्यक्रमास उपस्थिती. त्यानंतर दुपारी
1 वाजता अमरावती येथून वाहनाने नागपूरकडे प्रयाण करतील.
00000
जिल्ह्यात 7
फेब्रुवारीला 'नवोदय'ची प्रवेश परीक्षा; 3 केंद्रांवर होणार आयोजन
अमरावती, दि. 16 (जिमाका): जवाहर
नवोदय विद्यालयातील इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या (लेटरल एन्ट्री) रिक्त जागांसाठीची
निवड चाचणी परीक्षा शनिवार, 7 फेब्रुवारी 2026 रोजी
आयोजित करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्यातील एकूण 3 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार
असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
जवाहर नवोदय विद्यालयातील दर्जेदार शिक्षणाची संधी ग्रामीण आणि
शहरी भागातील सर्व पात्र विद्यार्थ्यांना मिळावी, या उद्देशाने ही प्रवेश
प्रक्रिया राबविली जात आहे. या परीक्षेसाठी पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी
वेळेपूर्वी आपली तयारी पूर्ण करावी. परीक्षेच्या नियोजनासाठी निश्चित करण्यात
आलेल्या 3 केंद्रांवर आवश्यक सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून,
विद्यार्थ्यांनी आपल्या प्रवेशपत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
या परीक्षेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील गुणवंत विद्यार्थ्यांना राष्ट्रीय
स्तरावरील शैक्षणिक प्रवाहात येण्याची मोठी संधी मिळणार आहे.
00000
युवक-युवतींना रोजगारांच्या संधी
कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ मंगळवारी
अमरावती, दि.
16 (जिमाका) : अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व
उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत सुशिक्षित बेरोजगार
युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ‘पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार
मोहिमे’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, अमरावती व शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय,
अमरावती यांचे संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन मंगळवार, दि.
20 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. तसेच मेळाव्यामध्ये
पार्कसन्स स्किल इन्स्टिट्यूट, नागपूरचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहे.
जिल्ह्यातील
युवक-युवतींना नोकरीच्या संधी मिळवून देण्याच्या उद्देशाने जास्तीत-जास्त उमेदवारांना
रोजगार मेळाव्यामधून नोकरी देण्याचा प्रयत्न जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता
मार्गदर्शन केंद्रातर्फे करण्यात येतो. त्यात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी
विविध आस्थापनांचे, कंपन्यांचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट
मुलाखती घेतील. मुलाखतीनंतर पात्र ठरणा-या उमेदवारांना लगेच नोकरीची संधी मिळेल.
या मेळाव्यामध्ये
सहभागी होण्यासाठी www.mahaswayam.gov.in या लिंकवर जाऊन ऑनलाईन
नोंदणी करावी. Employment वर क्लिक करावे. Job Seeker हा पर्याय निवडून
आपला नोंदणी, आधार कार्ड क्रमांक व पासवर्ड साईन इन करा. आपल्या होम पेजवरील Job
Fair हा पर्याय निवडा. District मध्ये Amravati जिल्हा निवडून Fiter बटनवर क्किल करावे.
नंतर दिनांकित मेळावा निदर्शनास येईल. त्यासमोर असलेल्या Action बटनच्या खाली View व Apply बटन
दिसेल. मेळाव्यास उपस्थित राहणारे उद्योजक व त्यांच्याकडील पदाबाबत माहिती दिसेल. आपल्या
पात्रतेनुसार पदाची निवड करून Apply बटनवर क्लिक करा. I Agree हा पर्याय निवडा. शेवटी
Successfully Applied for the Job असा Message दिसेल. अशा रितीने आपण ऑनलाईन सहभाग
नोंदवावा. आपली रजिट्रेशन Slip PDF ची प्रिंट काढून मेळाव्याच्या दिनांकास उपस्थित
राहावे.
याबाबत काही
अडचण असल्यास अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,
दुरध्वनी क्रमांक 0721-2566066 किंवा amravatirojgar@gmail.com या इमेलवर संपर्क
साधावा. तसेच 20 जानेवारी 2026 रोजी जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेपो रोड, अमरावती येथे
स्वखर्चाने बायोडाटा, पासपोर्ट साईज फोटो व आवश्यक कागदपत्रासंह कार्यालयात प्रत्यक्ष
उपस्थित रहावे, असे आवाहन अमरावती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन
केंद्रामार्फत करण्यात आले आहे.
0000000
No comments:
Post a Comment