पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा
अमरावती, दि. 23 (जिमाका) : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा शनिवार दि. 24 जानेवारी रोजी जिल्ह्याच्या दौरा आहे.
दौऱ्यानुसार श्री. बावनकुळे सकाळी 11.30 ते 12.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जनता दरबारात नागरिकांना भेटतील. दुपारी 1 वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हा नियोजन समिती सभा घेतील. सायंकाळी 5 वाजता जिल्हा नियोजन भवन येथे पत्रकार परिषद राहील. त्यानंतर सोईनुसार नागपूरकडे प्रयाण करतील.
000000
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा आज जनता दरबार
अमरावती, दि. 23 (जिमाका): पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा जनता दरबार शनिवार, दि. 24 जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह येथे सकाळी 11.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.
जनता दरबारात पालकमंत्री श्री. बावनकुळे नागरिकांना भेटीसाठी उपलब्ध असतील. नागरिकांनी त्यांच्या तक्रारी, निवेदने सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000
नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांना
जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
अमरावती, दि. 23 (जिमाका): भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रेष्ठ क्रांतिकारक नेते व आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस आणि प्रसिद्ध व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण अभिवादन केले.
उपजिल्हाधिकारी ज्ञानेश्वर घ्यार यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
000000

.jpeg)
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment