जागतिक हवामान दिनानिमित्त
दिलखुलासमध्ये मान्यवरांच्या प्रतिक्रिया
मुंबई दि. २७ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात जागतिक हवामान दिनानिमित्त बदलते हवामान : आव्हाने आणि उपाय योजना या विषयावर मान्यवरांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. या प्रतिक्रिया आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून बुधवार दि.२८ मार्च आणि गुरुवार दि. २९ मार्च रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहेत. निवेदक श्रीमती शिल्पा नातू यांनी या कार्यक्रमाचे निवेदन केले आहे.
२३ मार्च जागतिक हवामान दिनानिमित्त वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रमहाराष्ट्र विधानसभा मंडळ सचिवालयपर्यावरण विभागमहाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला एक संवाद सन्माननीय विधिमंडळ सदस्यांशी या कार्यक्रमात बदलते हवामान : आव्हाने आणि उपाय योजना या विषयावर विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकरविधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडेमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसपर्यावरण मंत्री रामदास कदमपर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर आणि अभिजित घोरपडे यांनी हवामानात सातत्याने होत असलेल्या बदलांमुळे पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन कसे करण्यात यावे, याबाबतची माहिती दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती