पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत
महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे
वनविकासातील लोकसहभाग अमूल्य
- मुख्यमंत्री
मुंबई, दि. २१ : पर्यावरणस्नेही विकासाची संकल्पना स्वीकारत महाराष्ट्रात शाश्वत विकासाची अनेक कामे हाती घेण्यात आली असून महाराष्ट्राच्या वन विकासात लोकसहभाग अमूल्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय वन दिनाचे औचित्य साधत संत तुकाराम वनग्राम पुरस्कारांचे वितरण तसेच वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गौरव आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वनमंत्री सुधीर मुनगंटीवारपशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकरआमदार मंगलप्रभात लोढामुख्य सचिव सुमित मल्लिक,  वन विभागाचे सचिव विकास खारगेवन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल यांच्यासह पुरस्कार प्राप्त गावातील संयुक्त वन व्यवस्थापन समित्यांचे सदस्य तसेच अधिकारी कर्मचारी  उपस्थित होते.
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दमदार नेतृत्वाखाली वन विभागाने मागील तीन वर्षात लक्षणीय काम केल्याने महाराष्ट्र वनक्षेत्रात देशपातळीवर ४ क्षेत्रात पहिल्या स्थानावर आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले कीवनेत्तरक्षेत्रात २०१५ ते २०१७ या कालावधीत २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली आहे. पर्यावरण संतुलनाच्या कामात वन विभागाने  महत्वाचा वाटा उचलला आहे. वन वाचतील ती नागरिक आणि समाजाच्या सहभागातून हे वास्तव स्वीकारून वन विभागाने लोकसहभाग मिळवलास्वंयसेवी संस्थासंघटनासमाजातील सर्व स्तरातील लोक एकत्र केले आणि या माध्यमातून वन विकासाच्या संकल्पामागे एक मोठी फळी निर्माण केली. हे जंगलहे वन आपलं आहे ही भावना लोकमनात निर्माण करण्यात वन विभाग यशस्वी ठरला. यासाठी वन विभागाचे सर्व अधिकारी- कर्मचारीसंयुक्त वन व्यवस्थापन समित्या अभिनंदनास पात्र असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
संकल्प करणे सोपे परंतू तो अंमलात आणणे कठीण असते असे सांगून ५० कोटी वृक्ष लागवडीच्या संकल्पाची याच लोकसहभागाच्या सुत्रातून पूर्तता होईल असा विश्वास वाटत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणालेआता वृक्ष लागवड एक लोकचळचळ झाली आहे. वन आणि वन्यजीव संवर्धनातून रोजगार निर्मिती होत आहे.  इको टुरिझम मुळे वनक्षेत्रातील आणि वनालगतच्या गावातील लोकांना मोठ्याप्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत आहेत.  निसर्गाशी साधर्म्य राखून आपल्या अनेक पिढ्या वर्षानूवर्षे जगल्या. हेच संचित आपल्याला पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे आहे. निसर्गाशी आपलं नातं काय आहे हे सांगणाऱ्या संत तुकारामांनी वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे असं सांगत एक बृहत परिवार निर्माण केला. त्यांचा हा शाश्वत विचार आपल्याला समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचवायचा असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
जगण्यासाठीच्या आवश्यकतेमध्ये वन विभाग पहिला- सुधीर मुनगंटीवार
कोणत्याही राज्यात  वन विभाग प्राधान्यक्रमात शेवटून पाचवा  मानला असला तरी तो संपूर्ण जगात जगण्यासाठीच्या ज्या आवश्यकता आहेतत्यात मात्र पहिल्या क्रमांकावर आहे असे सांगून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले कीवृक्षाची जोपासणा हीच निसर्गाची उपासना आहे. त्यामुळे या विभागाकडे सरकारी विभाग म्हणून पाहू नये. वृक्ष लावून जगवणे हे एक ईश्वरीय कार्य आहे. पुढच्या पिढीच्या जन्मासाठी पृथ्वीवर वन ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. वन हा माणसांना जगवणारा विभाग आहे तसाच तो महसूल मिळवून देणाराही विभाग आहे. महसूल वाढवण्यासाठी उर्जा लागते. ती उर्जा देण्याचे काम वन विभाग करतो. शुद्ध आचारशुद्ध विचार आणि शुद्ध वर्तणूकीस प्रोत्साहन देणाऱ्या आणि वन से धन तक आणि जल से जीवन के मंगलतक संदेश देणाऱ्या वन विभागाला पर्याय नसल्याचेही ते म्हणाले.
 “वने आणि शाश्वत शहरे हे यावर्षीच्या आंतरराष्ट्रीय वन दिनाचे घोषवाक्य आहे. शहरांमध्ये वायू प्रदुषण वाढते आहेदाटीवाटीच्या घरांनी श्वास कोंडतो आहेहे टाळायचे असेल तरफॅमिली फॉरेस्ट ही संकल्पना प्रत्येकाने स्वीकारण्याची गरज आहे. ५० कोटी वृक्ष लागवडीत सहभाग नोंदवून प्रत्येकाने यात योगदान द्यायचे आहे. आतापर्यत वन विभागाच्या महावृक्ष लागवडीत लोकांनी खूप उर्त्स्फूतपणे सहभाग नोंदवला.२ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प २ कोटी ८१ लाख तर ४ कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प ४ कोटी ८३ लाख रोपं लावून पूर्णत्वाला गेला आहे. येत्या पावसाळ्यात राज्यात १३ कोटी वृक्ष लागवड आपल्या सर्वांना मिळून करावयाची आहे. हा पर्यावरण रक्षणाचा गोवर्धन उचलण्यासाठी सर्वांचे योगदान अपेक्षित आहेअसेही ते म्हणाले.
भारतीय वन सर्वेक्षण अहवालानुसार  महाराष्ट्राच्या वृक्षाच्छादनामध्ये २७३ चौ.कि.मी ची वाढ झाली आहे. तसेच घनदाट जंगल क्षेत्रात ५१ चौ.कि.मीकांदळवन क्षेत्रात ८२ चौ.कि.मी,जलव्याप्त क्षेत्रात ४३२ चौ.कि.मी तर बांबू क्षेत्रात ४४६२ चौ.कि.मी ची वाढ नोंदविण्यात आली आहे. विकासासाठी वनविभागाची जागा देण्याचे आव्हान असतांनाही या सर्व क्षेत्रातील वाढ उल्लेखनीय असल्याचे वनमंत्र्यांनी सांगितले. आज ४५ लाख लोक हरित सेनेचे सदस्य झाले आहेत. त्यांना १३ कोटी वृक्ष लागवडीच्या कामात सहभागी करून घेतले जाणार असल्याचे सांगून वनमंत्र्यांनी हरित महाराष्ट्राचे आणि स्व. यशवंतराव चव्हाण यांचे स्वप्नं साकार करण्यासाठी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करूयाअसे आवाहन केले.
प्रत्येक जिल्ह्यात एक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी असावा अशी अपेक्षा व्यक्त करून पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी वन आणि पशुसंवर्धन  व दुग्धविकास विभागाचे कार्य परस्परांना पूरक असल्याचे सांगितले. जनचळवळ काय करू शकते हे वन विभागातील वृक्ष लागवड मोहिमेने दाखवून दिल्याचेही ते म्हणाले.
नागरी जीवन सुखी होण्यासाठी शहरात वाढत्या वनक्षेत्राची गरज – मुख्य सचिव
मुख्य सचिव सुमित मल्लिक यांनी राज्यात वाढत्या नागरिकीकरणामुळे अनेक प्रश्न निर्माण होत असल्याचे सांगतांना नागरी जीवन सुखी होण्यासाठी शहरात वाढत्या वनक्षेत्राची गरज व्यक्त केली. ते म्हणाले कीमुंबईला १२ टक्के पाणी हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तुलसी आणि विहार तलावातून मिळते  तर उर्वरित ८८ टक्के पाणी इतर पाणलोट क्षेत्रातून. पाणलोटक्षेत्राच्या विकासासाठीही वनांची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. जागतिक तापमान वाढीमुळे निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर वृक्ष लागवड हा एक पर्याय असून महाराष्ट्रातील २० टक्क्यांचे वनक्षेत्र ३३ टक्क्यांपर्यंत नेण्यासाठी समाजातील सर्व लोकांच्या सहकार्याची गरज आहे. वाढत्या लोकसंख्येचा दबाव वनक्षेत्रावर आहे अशा परिस्थितीत वनसंरक्षण करणे हे आव्हानात्मक काम असून हे काम करत असलेल्या वनविभागातील कर्मचारी अधिकारी यांचे त्यांनी अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनसचिव विकास खारगे यांनी केले. त्यात त्यांनी वनविभागाने मागील तीन वर्षात हाती घेतलेल्या अनेक महत्वाकांक्षी उपक्रमांचीउल्लेखनीय कामांची माहिती दिली.
मुख्यमंत्री यांच्या हस्ते यावेळी हरित निर्माणाची तीन वर्षे या पुस्तकासह इतर ३ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. तसेच वन विभागाच्या विविध कामांची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली. कार्यक्रमात वनसेवेत उत्कृष्ट काम करणाऱ्या २९ अधिकाऱ्यांचा विविध पुरस्काराने गौरव करण्यात आला. पुणे वनपरिक्षेत्रातील भोर येथील वनरक्षक कै. सदाशिव त्र्यंबकअप्पा नागठाणे यांचा वन वणवा विझवतांना मृत्यू झाला होता. त्यांना आजच्या कार्यक्रमात मरणोत्तर सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या कुटुंबियांनी या पुरस्काराचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वीकार केला.
संत तुकाराम वनग्राम योजनेतील पुरस्कार प्राप्त संयुक्त वन व्यवस्थापन समित्या
प्रथम पारितोषिक विभागून-
·         लांबोटा संयुक्त वन व्यवस्थापन समितीता. निलंगा- जि. लातूरवन वृत्त औरंगाबाद
·         काचुर्ली संयुक्त वन व्यवस्थापन समिती ता. त्र्यंबक,  जिल्हा नाशिक
द्वितीय पारितोषिक विभागून-
·          खांडगेदरा संयुक्त वन व्यवस्थापन समिती- तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर- वनवृत्त नाशिक
·         उथळपेठ संयुक्त वन व्यवस्थापन समिती- तालुका मुल- जि. चंद्रपूर- वनवृत्त चंद्रपूर
·         चिट्टूर संयुक्त वन व्यवस्थापन समिती- ता. सिरोंचाजि. गडचिरोली-वनवृत्त गडचिरोली
तृतीय पारितोषिक विभागून-
·         हिवरे संयुक्त वन व्यवस्थापन समिती- तालुका कोरेगाव- जि. सातरा वनवृत्त कोल्हापूर
·         पाल संयुक्त वन व्यवस्थापन समिती- तालुका रावेरजि. जळगांववनवृत्त धुळे
मराठवाडा प्रशासकीय विभागाचे बक्षीस- कात्री संयुक्त वन व्यवस्थान समितीतालुका तुळजापूरजि. उस्मानाबादवनवृत्त औरंगाबाद.
००००




Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती