Thursday, July 4, 2024

निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार

 










निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातंर्गत 'संपुर्णता अभियानाचे' चिखलदरा येथून सुरुवात; विकासाच्या विविध योजना राबविणार

 

             अमरावती, दि. 04 (जिमाका): केंद्र शासनाच्या निती आयोगाच्या आकांक्षित तालुका ‘संपूर्णता अभियानाला’ आज चिखलदरा येथे सुरुवात झाली आहे. या अभियानाची सुरुवात रॅली काढून करण्यात आली. तसेच निती आयोगाने दिलेले उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी शपथ घेण्यात आली. चिखलदरा तालुका हा विकासापासून वंचित असल्यामुळे निती आयोगाने विशेष लक्ष देत अकांक्षित तालुका कार्यक्रम सुरु केला आहे. मागास प्रवर्गातील सर्व लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आजच्या अभियानाची सुरुवात करण्यात आली .

 

              नीती आयोगाचे एकुण 6 निर्देशांक पूर्ण करावयाचे आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषण, कृषी, सामाजिक विकास या निर्देशांकावर भर देण्यात येत आहे. संपूर्णता अभियानामध्ये गर्भवती महिलांची प्रसुती पुर्व काळजी आणि त्यांना पोषक आहार, मधुमेह आणि उच्च रक्तदाब असणाऱ्या व्यक्तींची तपासणी आणि उपचार, माती परीक्षण, आणि बचत गट यांना मिळणारा फिरता निधी, शाळेतील विद्यार्थ्यांचा संक्रमण दर, दहावी व बारावी मधील पास विद्यार्थ्यांची टक्केवारी हे दर्शके आहेत.

 

नीती आयोगाचे रँकिंग नुसार चिखलदरा सद्या 500 पैकी 55 क्रमांकावर आघाडी घेत विकासात्मक रूपरेषा नुसार कार्य करत आहे. चिखलदरा आदिवासी बहुल असल्यामुळे इथे विकासाच्या विविध योजना निती आयोगामार्फत राबविण्यात येत आहे.

 

            चिखलदरा तालुका गट विकास अधिकारी जिवनलाल भीलावेकर यांनी या आकांक्षित तालुका संपूर्णता अभियानाचे दीप प्रज्वलन करून उद्घाटन केले. यावेळी गटविकास अधिकारी भीलावेकर यांनी अभियानांतर्गत असणाऱ्या  शिक्षण, आरोग्य, कृषी, उमेद, पशुसंवर्धन,पाणी स्वच्छ्ता, भौतिक सुविधा. पायाभूत सुविधा इ. विभागांच्या निर्देशांकांच्या प्रगतीचा आढावा घेत सर्व निर्देशांक पुर्ण करु असे ग्वाही सुद्धा दिली. गट विकास अधिकारी यांनी उपस्थितांसोबत स्वतः ही संपूर्णता अभियानातील दर्शकांची संपूर्णता करण्यासाठी योगदान देण्याचे आणि आकांक्षित तालुक्याला आरोग्यदायी, सक्षम आणि समृद्ध बनवण्याची प्रतिज्ञा घेतली.

 

            संपूर्णता अभियान हे 1 जूलै ते 30 सप्टेंबर 2024 दरम्यान चालणार आहे. त्यामधील एकुण 40 निर्देशांकपैकी 6 निर्देशांक येत्या 3 महिन्यामध्ये पुर्ण करण्याचे निती आयोगाला अपेक्षित आहे. या अभियानांतर्गत येणारे निर्देशांक आणि त्यांचा कृती आराखडा पुर्ण करण्यासाठीं विविध विभागाचे उपस्थित अधिकारी वर्गाने सुद्धा मार्गदर्शन केले. गटविकास अधिकारी यांनी आशा, अंगणवाडी सेविका, कर्मचारी, स्वयंसहायता बचत गट, एएनएम यांच्या कार्यातील प्रगतीचे कौतुक केले व सर्वांनी एकत्र येऊन आरोग्य आणि पोषण या क्षेत्रात उत्तम कामगिरी करावी,  असे आवाहन केले. तसेच तालुका आरोग्य अधिकारी, एकात्मिक बाल विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, उमेद विभागाचे अधिकारी व संबंधित सर्व विभागांचे अधिकारी वर्ग उपस्थित होते. तसेच अकांक्षीत तालुका कार्यक्रम फेलो अतुल खडसे यांनी संचालन व आभार मानले.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...