अनोळखी मृत
इसमाची ओळख पटविण्याबाबत आवाहन
अमरावती, दि. 09 (जिमाका): पोलिस ठाणे
सिटी कोतवाली अमरावती (शहर) अंतर्गत एका अनोळखी इसमाचा मृतदेह चांदुर बाजार येथे सरकारी
दवाखान्यात उपचारा दरम्यान मरण पावला. मृतकाचे अंदाजे वय 45 वर्षे असून मृतकाचा रंग
निम गोरा, उंची 5 फुट 5 इंच, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी काळी पांढरी बारीक आहे.
मृतकाच्या नातेवाईकाचा शोध लागावा व अनोळखी
इसमाची ओळख पटविण्यास पोलीस नियंत्रण कक्ष, अमरावती शहर दुरध्वनी क्रमांक -
0721-2672001 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस स्टेशन सिटी कोतवाली, अमरावती
यांनी केले आहे.
00000
No comments:
Post a Comment