Monday, July 15, 2024

जिल्हाधिकारी लाडक्या बहिणीच्या दारी! शिराळा तालुका अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट!

 




जिल्हाधिकारी लाडक्या बहिणीच्या दारी!

शिराळा तालुका अमरावती येथे जिल्हाधिकाऱ्यांची अचानक भेट!

 

            अमरावती, दि. १३ (जिमाका) : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ' सर्व लोकांपर्यंत पोहोचावी आणि या योजनेपासून कोणीही वंचित राहू नये, त्याचबरोबर या योजनेत काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी जिल्हाधिकारी सौरभ कटियार आणि मनपा आयुक्त  सचिन कलंत्रे यांनी काही नोंदणी  केंद्रांना तसेच अंगणवाडी केंद्रांना भेटी देऊन लाभार्थ्यांशी संवाद त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्याचबरोबर या योजनेचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवत अमरावती जिल्ह्यात जास्तीत-जास्त लाभार्थ्यांची नोंद व्हावी, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

                  मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आजपर्यंत जिल्ह्यातील 85 हजार लाभार्थ्यांनी नोंदी केल्या असून अद्यापही 80 टक्के लाभार्थ्यांचे नोंदी होणे बाकी आहेत. हे काम करत असताना कर्मचाऱ्यांना कोणत्या अडचणी येतात, अर्ज अपलोड करतानी काय काळजी घ्यावी लागते, त्याचबरोबर लाभार्थी महिलांच्या कोणत्या समस्या आहेत त्यांच्याकडे प्रमाणपत्र आहेत किंवा नाही , नसल्यास त्यांना प्रमाणपत्र कशा पद्धतीने तात्काळ मिळवून देता येतील  या आणि अशा सर्व बाबींचा सखोल आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्त यांनी अमरावती शहरातील तीन केंद्रावर तर शिराळा गावात जाऊन लाभार्थ्यांची आणि या योजनेत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, समूह साधन कर्मचारी इत्यादी कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या योजनेतील बारकावे समजून घेत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्याचबरोबर लाभार्थ्यांना लागणारे सर्व कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करून द्या,असे आदेशही संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना दिले. या योजनेतील कोणताही लाभार्थी नाव नोंदणी करायला आला असता त्याला सौजन्याची वागणूक मिळावी आणि त्याच्याकडून ऑफ लाइन पद्धतीने अर्ज जमा करून कर्मचाऱ्यांनी त्यांच्या वेळेत तू ऑनलाईन करावा असेही जिल्हाधिकारी यांनी सुचित केले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपविभागीय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास घोडके,  तहसीलदार विजय लोखंडे, मनपा उपआयुक्त नरेंद्र वानखेडे, गटविकास अधिकारी अभिषेक कासोदे, बालविकास प्रकल्प अधिकारी विलास दुर्गे आदी उपस्थित होते.

 

         "ग्रामीण आणि शहरी भागात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काम अतिशय नियोजनबद्धरित्या सुरू असून कर्मचारी या योजनेबाबत जागरूक असून जास्तीत-जास्त लाभार्थ्यांची नोंद करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. येत्या पंधरा दिवसात अमरावती जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांची नोंद करणे आमचे उद्दिष्ट आहे."

                                                                                                    .... जिल्हाधिकारी सौरभ कटियार

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...