Friday, July 19, 2024

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासंदर्भात 22 जुलै रोजी ऑनलाईन प्रशिक्षण;

 

जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धासंदर्भात 22 जुलै रोजी ऑनलाईन प्रशिक्षण;

          अमरावती, दि. 19 (जिमाका): क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद तथा जिल्हा कार्यालय. अमरावतीद्वारे विविध शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. सन 2024-25 या सत्रातील क्रीडा स्पर्धा आयोजनासाठी जिल्हा व तालुक्यातील शिक्षक, शारिरीक शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांची एकदिवस  ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन दि. 22 जुलै 2024 रोजी जिल्हा क्रीडा संकुल, मार्डी रोड येथे करण्यात आले आहे. या ऑनलाईन प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

            मनपा क्षेत्र अंतर्गत शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, शारिरीक शिक्षक यांचे स्पर्धा ऑनलाईन प्रशिक्षण सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंत या कालावधीत आयोजीत केले. तर अचलपूर, मोशी, वरुड, दर्यापूर, चिखलदरा, धारणी, अंजनगांवसुर्जी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, शारिरीक शिक्षक, सहाय्यक शिक्षक यांचे स्पर्धा ऑनलाईन प्रशिक्षण दुपारी 2 ते 4 या कालावधीत आयोजीत केले आहे. चांदुरबाजार, चांदुर रेल्वे, नांदगांव खंडेश्वर भातकुली, अमरावती, तिवसा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या  शाळा, महाविद्यालयातील शिक्षक, शारिरीक शिक्षक यांचे स्पर्धा ऑनलाईन प्रशिक्षण दुपारी 4 ते 6  या कालावधीत आयोजीत केले आहे. तरी दिलेल्या वेळेत सदर ऑनलाईन प्रशिक्षणाकरीता उपस्थितीत राहुन शासकीय उपक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...