Wednesday, July 24, 2024

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील विद्यार्थ्यांशी साधणार ऑनलाईन संवाद

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री  चंद्रकांतदादा पाटील विद्यार्थ्यांशी साधणार ऑनलाईन संवाद

        अमरावती, दि. 24 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाव्दारे विद्यार्थ्यांसाठी विविध शिष्यवृती व योजना राबविण्यात येतात. या योजनांची  माहिती देण्याकरीता राज्यातील सर्व विद्यार्थी पालक व संस्था प्रतिनिधी यांचे सोबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे दि. 25 जुलै 2024 रोजी सकाळी 10 वाजता वेबिनारच्या माध्यमातून संवाद साधणार आहे. या ऑनलाईन कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण उच्च शिक्षण महाविद्यालयामध्ये येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमात संवाद साधण्यासाठी www.parthlive.com या लिंकचा वापर करुन सर्व विद्यार्थी, पालक व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधीनी सहभागी व्हावे, असे आवाहन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. सुबोध भांडारकर यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...