तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम

 










तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम

 

अमरावती, दि. 8 : राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल पुणे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील विविध तालुक्यात पूर, आग, विज, भूकंप व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

 

          जिल्ह्यात पूर, आग, विज, भूकंप तसेच आपत्ती व्यवस्थापन या विषयावर प्रशिक्षण व जनजागृती करण्यासाठी राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल, पुणे दलाचे चमू येत आहे. त्याचा कार्यक्रम दौरा दि. 7 ते 15 सप्टेंबर 2023 या कालावधीत राहणार असून ते अमरावती तालुका व शहर, चांदुर बाजार, धामनगाव रेल्वे, तिवसा, दर्यापूर, धारणी या तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय येथे आयोजित केला आहे.

 

प्रशिक्षण व जनजागृती  कार्यक्रम याप्रमाणे :

          राष्ट्रीय आपदा प्रतिसाद दल पुणे व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्याव्दारे आग, वीज, भूकंप व प्रथमोपचार या विषयी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम तालुकास्तरावर होणार आहे. ते याप्रमाणे.

          अमरावती तालुक्यात दि. 7 सप्टेंबर 2023 रोजी मनिबाई गुजराती हायस्कूल अमरावती व बचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम पार पडला.

चांदुर बाजार तालुक्यात शुक्रवार दि. 8 सप्टेंबर रोजी गो. सी. टोम्पे महाविद्यालय, चांदुर बाजार जि. अमरावती.

धामणगाव रेल्वे तालुक्यात शनिवार दि. 9 सप्टेंबर रोजी आदर्श महाविद्यालय, ता.धामणगाव रेल्वे जि. अमरावती.

अमरावती शहर येथे रविवार दि. 10 सप्टेंबर रोजी जिल्हा शोध व बचाव पथक व अग्निशामक विभाग, महानगर पालिका अमरावती.

तिवसा तालुक्यात सोमवार दि. 11 सप्टेंबर रोजी कला व विज्ञान महाविद्यालय, कुऱ्हा ता. तिवसा जि.अमरावती.

दर्यापूर तालुक्यात मंगळवार दि. 12 सप्टेंबर 2023 रोजी जे. डी. पाटील महाविद्यालय, दर्यापूर.

धारणी तालुक्यात बुधवार दि. 13 सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालय, धारणी.

अमरावती येथे गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी होमगार्ड कार्यालय अमरावती.

मोर्शी तालुक्यात शुक्रवार दि. 15 सप्टेंबर रोजी तहसिल कार्यालय, मोर्शी येथे होणार आहे.

सर्व प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम हे सकाळी 11 ते 3 वाजेदरम्यान संबंधित तालुक्याच्या ठिकाणी होणार आहे. तरी या प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले आहे.

00000

 


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती