कौशल्य विकास विभागामार्फत 17 सप्टेंबरला नागपूर येथे ‘इंडस्ट्री मीटचे’ आयोजन

 

कौशल्य विकास विभागामार्फत 17 सप्टेंबरला नागपूर येथे ‘इंडस्ट्री मीटचे’ आयोजन

300 नामांकित उद्योजकांसमवेत सामंजस्य करार

 

           अमरावती, दि. 15 : बेरोजगार युवकांना रोजगारांच्या संधी व उद्योगांना आवश्यक असलेले कुशल, अकुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन आणि उद्योगसमुह, प्लेसमेंट एजन्सीज यांच्यात सामंजस्य करार रविवार, 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता इंडस्ट्री  मीटच्या माध्यमातून होणार आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरातील गुरुनानक भवन येथे इंडस्ट्री मीटहोईल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शुभारंभ होईल.

         जिल्ह्यातील  विविध नामांकित उद्योग, उद्योजक संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात येणार आहे. कौशल्य रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन यांची प्रमुख उपस्थित असतील.

जिल्ह्यातील नामांकित उद्योग, विविध उद्योग संघटना व प्लेसमेंट एजन्सीज यांच्यासोबत  सामंजस्य करार इंडस्ट्री मीट’च्या माध्यमातून होणार आहे.यामध्ये औद्योगिक संघटना, उद्योजक, मोठे हॉटेल्स, हेल्थकेअर, चिल्लर व थोक किराणा, बांधकाम क्षेत्र, मॉल्स, प्लेसमेंट एजन्सीज सिक्युरिटी एजन्सीज यांना आवश्यक ते कुशल मनुष्यबळ  उपलब्ध करुन देत आहे.

इंडस्ट्री मीटमध्ये अमरावती विभागातील 192 व नाशिक विभागातील 122 अशा एकूण 314 नामांकित इंडस्ट्रीज, इंडस्ट्री असोसिएशन व प्लेसमेंट एजन्सीज यांचे समवेत  सामंजस्य करार होणार आहे. यामाध्यमातून एक लाखापेक्षा जास्त रोजगारांना संधी उपलब्ध होणार आहे.  इच्छुक उद्योजकांना प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी करारबाध्य करण्याची सुविधा उपलब्ध असून जास्तीत जास्त उद्योजकांनी इंडस्ट्री मीट उपक्रमामध्ये  उपस्‍थित राहावे, असे आवाहन कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रांजली यो. बारस्कर यांनी केले आहे. 

00000

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती