Wednesday, September 27, 2023

महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

 महाज्योतीमार्फत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण

अमरावती, दि. 27 : महाज्योतीमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटी च्या प्रशिक्षणासाठी टॅबचे वितरण करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना टॅब मंजुर झाला आहे त्यांनी कागदपत्रासह शुक्रवार दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, अमरावती येथे उपस्थित राहावे, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण माया केदार यांनी केले आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील इयत्ता 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जेईई, नीट व एमएचटी-सीईटीचे प्रशिक्षणाकरीता टॅबलेट देण्याची योजना राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत सन 2023-24 या शैक्षणिक सत्र करीता अमरावती जिल्ह्यातील इतर मागास वर्ग, भटक्या विमुक्त जाती, जमाती व विशेष मागास प्रवर्गातील 11 वी सायन्स मध्ये प्रवेश घेतलेल्या 394 विद्यार्थ्यांना टॅबलेट मंजूर झालेले आहे. ज्या विद्यार्थ्यांना टँब मंजुर झाल्याबाबतच्या संदेश महाज्योतीकडून प्राप्त झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, चांदुर रेल्वे रोड, अमरावती येथे उपस्थित राहावे.

000000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...