Friday, September 15, 2023

सार्वजनिक उत्सव, समारंभात उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीसाठी सनियंत्रण समिती गठीत


 

सार्वजनिक उत्सव, समारंभात उभारण्यात येणाऱ्या

 मंडप तपासणीसाठी सनियंत्रण समिती गठीत

 

अमरावती, दि. 15 : महानगरपालिका क्षेत्रांमध्ये सार्वजनिक सण, उत्सव व समारंभामध्ये उभारण्यात येणाऱ्या मंडप तपासणीसाठी सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे. या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास नागरिकांनी तपासणी पथक सदस्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले आहे.

          नगर विकास विभागाच्या निर्देशाप्रमाणे आगामी गणेशोत्सव व इत्तर सार्वजनिक समारंभासाठी उभारण्यात येणारे मंडप, पेन्डॉलची तपासणी समारंभ सुरु होण्यापुर्वी आवश्यक आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सनियंत्रण समिती गठीत करण्यात आली असून तपासणी पथक याप्रमाणे आहे.

1.     उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी अनिलकुमार  भटकर यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9881008494, दुरध्वनी क्रमांक 0721-2565023 व ई-मेल sdo.amaavati@gmail.com.

2.    महानगरपालिका झोन क्रमांक-1 सहायक आयुक्त नंदकिशोर तिखिले यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 7030922889, दुरध्वनी क्रमांक 0721-2676626 व ई-मेल tikhilenandkishor7@gmail.com.

3.    सहायक पोलिस आयुक्त मनिष ठाकरे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9850106057, दुरध्वनी क्रमांक 0721-2660330 व ई-मेल acptraffic.cpamt@mahapolice.gov.in

          सार्वजनिक उत्सव व समारंभाप्रसंगी उभारण्यात येणाऱ्या मंडप, पेंडॉलच्या संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास वरील तपासणी पथक सदस्यांशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...