जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

 

जि.प., पं. स. निवडणूकीसाठी नियोजनभवनात गुरूवारी आरक्षण सोडत

अमरावती, दि. 26 (विमाका) : अमरावती जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणूक-2022साठी जिल्हा परिषद सदस्यांच्या एकूण 66 पदांच्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण या पदांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन गुरूवारी (28 जुलै) आरक्षण सोडत होणार आहे. पं. स. निवडणुकीसाठी जिल्ह्यातील एकूण 11 तहसील स्तरावर याच दिवशी आरक्षण सोडत होईल.

जिल्हाधिकारी श्रीमती पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. निवडणुकीसाठीची सोडत प्रक्रिया सकाळी 11 वाजता होणार आहे.  प्रशासनाकडून सोडतीच्या अनुषंगाने पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे. उपजिल्हा निवडणूक कार्यालयाकडून कार्यवाही होत आहे. सोडत सभेच्या अनुषंगाने आवश्यक बाबी, आवश्यक पोलीस बंदोबस्त आदी तजवीज करण्यात येत आहे.

जिल्ह्यातील 11 तहसील स्तरावर पं. स. निवडणुकीची आरक्षण सोडत गुरूवारी सकाळी 11 वा. होईल. जिल्ह्यातील तिवसा, धामणगाव रेल्वे व चांदूर रेल्वे या अस्तित्वात असलेल्या पंचायत समित्या वगळता उर्वरित 11 पं. स. निवडणूकीसाठी सोडत होणार आहे. 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती