Tuesday, July 19, 2022

राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्टला होणार

 राष्ट्रीय लोक अदालत 13 ऑगस्टला होणार


अमरावतीदि.19:  अमरावतीसह जिल्ह्यातील सर्व न्यायालयांत शनिवारदि. 13 ऑगस्ट रोजी  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

अदालतीत दाखल व दाखलपूर्व अशी प्रकरणे तडजोडीने व सामंजस्याने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत. नागरिक तसेच पक्षकारांनी  लोकअदालतीसमक्ष आपली प्रकरणे सामंजस्याने  व तडजोडीने मिटवावीतअसे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एम. जोशी यांनी केले आहे.

राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या  सूचनेनुसार राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही.

नागरिक तसेच पक्षकारांनी तडजोडप्राप्त प्रलंबित खटले  लोकअदालतीसमक्ष तडजोडीने व सामंजस्याने मिटविण्यासाठी संबंधित न्यायालयात अर्ज करावा. तसेच (दाखलपूर्व ) प्रकरणांबाबत नजिकच्या संबंधित जिल्हा किंवा तालुका न्यायालय यांच्याशी संपर्क साधावा.

मा. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दि, 6, 8, 10, 11 व 12 ऑगस्ट या कालावधीत यासंबंधी विशेष मोहीम (Special Drive) राबविण्यात येणार आहे. संबंधितांनी लोकअदालतीत आपली प्रकरणे सामंजस्याने व तडजोडीने मिटवावीत. अशी माहिती अमरावती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव जी. आर. पाटील  यांनी केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 21.06.2025

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा: 'एक पृथ्वी, एक...