दारिद्र्यरेषेखालील दहावी उत्तीर्ण मुलींसाठी विनामूल्य अभ्यासक्रम


 

दारिद्र्यरेषेखालील दहावी उत्तीर्ण मुलींसाठी विनामूल्य अभ्यासक्रम

 

          अमरावतीदि. 21 : सिंबायोसिस विद्यापीठ आणि फियाट इंडिया ऑटोमोबाईलमार्फत गरीब घटकातील मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी दोन वर्षांचा निवासी विनामूल्य अभ्यासक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थींनीनी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

दहावी उत्तीर्ण झालेल्या दारिद्र्यरेषेखालील गटातील दहावी उत्तीर्ण विद्यार्थिनींसाठी ‘डिप्लोमा इन मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स हा दोन वर्षाचा निवासी विनामूल्य अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अंतिम मुदत 30 जुलै 2022 आहे. इच्छुक विद्यार्थिनींनी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या अभ्यासक्रमा उत्पादनगुणवत्तादेखभालपुरवठा साखळीमाहिती तंत्रज्ञानऔद्योगिक सुरक्षाकार्यसंस्कृतीटीमवर्क आणि कम्युनिकेशन स्किल्स यांचा समावेश आहे. हा अभ्यासक्रम विनामूल्य राहील. हा सेवा आणि उत्पादन क्षेत्रातील रोजगारभिमुख पदविका अभ्यासक्रम आहे.

प्रवेशासाठी दहावी उत्तीर्ण व महाराष्ट्रातील रहिवाशी असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.  वयोगट 16 ते 19 वर्षे दरम्यानच्या विद्यार्थिनींनी दि. 30 जुलैपूर्वी अर्ज करावा. अधिक माहितीसाठी 9588467393 तसेच 9699179680 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती