अमरावती विभागात सर्वदूर पाऊस जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6 मिमि पाऊस

 

अमरावती विभागात सर्वदूर पाऊस

जूनपासून आतापर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद

चोवीस तासांत यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6 मिमि पाऊस

 

अमरावती दि 18: अमरावती विभागात आज 56 तालुक्यात पाऊस झाला. प्राप्त अहवालानुसार, दुपारी बारा वाजेपर्यंत झालेल्या पावसाच्या घेण्यात आलेल्या नोंदीनुसार विभागात 1 जून ते आजपर्यंत 402.7 मिमि पावसाची नोंद करण्यात आली आहे. मागील 24 तासांत विभागात यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक सरासरी 60.6 मिलीमिटर पाऊस झाला.

विभागात नोंदला गेलेला आजचा तालुकानिहाय पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदा 1 जून पासून आजवर झालेल्या पावसाची आहे. सर्व आकडेवारी मिलीमिटर परिमाणात आहेत.

अमरावती जिल्हा : धारणी 82.2 (407.5), चिखलदरा 83.4 (534.3), अमरावती 63.3 (335.5), भातकूली 40.0 (260.0), नांदगाव खडेश्वर 69.3 (406.5), चांदूर रेल्वे 70.2 (368.2), तिवसा 45.4 (513.4), मोर्शी 61.6 (401.3), वरुड 25.7 (396.0), दर्यापूर 30.3 (259.7), अंजनगाव 43.2 (295.6), अचलपूर 49.1 (271.8), चांदूर बाजार 78.3 (425.4), धामणगाव रेल्वे 75.8(485.1) अमरावती जिल्ह्यात चोवीस तासात सरासरी 57.5 मि.मि पाऊस झाला. जिल्ह्यात यंदा आजवर सरासरी 376.1 मि.मि. पाऊस झाला.

          अकोला जिल्हा : अकोट 7.8 (196.0), तेल्हारा 44.4 बाळापूर 60.7 (422.7), पातूर 51.4 (337.4),  अकोला 37.6 (382.0), बार्शी टाकळी 29.0 (279.5), मुर्तीजापूर 28.9 (274.4), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 35.9 मि.मि तर आजवर 315.8मि.मि पाऊस झाला आहे.

          यवतमाळ जिल्हा : यवतमाळ 70.1(478.0), बाभूळगाव 103.4(466.1), कळंब 130.6 (516.4), दारव्हा 39.1 (358.8), दिग्रस 35.3 (438.2), आर्णी 38.8 (527.3), नेर 103.1 (430.2), पुसद 27.3 (383.7), उमरखेड 37.7 (491.3), महागाव 48.3 (575.3), वणी 41.2 (712.5), मारेगाव 42.0 (661.2), झरी जामणी 37.9 (602.8), केळापूर 42.4 (598.8), घाटंजी 47.6 (503.0), राळेगाव 147.9 (685.1), जिल्ह्यात 24 तासात सरासरी 60.6 तर यंदाच्या हंगामात आजवर सरासरी 525.2 मि.मि पाऊस झाला आहे.

          बुलडाणा जिल्हा :जळगाव जामोद 58.3 (231.8), संग्रामपूर 76.0 (281.6), चिखली 30.5 (365.3), बुलडाणा 32.7 (461.6), देऊळगाव राजा 13.1 (345.2), मेहकर 34.3 (394.9), सिंदखेड राजा 17.4 (398.3), लोणार 19.3 (332.4), खामगाव 47.3 (286.8), शेगाव 65.7 (362.4), मलकापूर 19.0 (233.8), मोताळा 22.4 (278.1), नांदूरा 33.5 (268.2), जिल्ह्यात दिवसभरात 35.4 तर यंदा च्या हंगामात आजवर 333.1 मि.मि. पाऊस झाला.

          वाशिम जिल्हा :  वाशिम 39.9 (397.4), रिसोड 28.5 (429.3), मालेगाव 41.6 (417.4), मंगरुळपिर 35.9 (410.4), मानोरा 38.1 (445.7), कारंजा 42.0 (289.3), जिल्ह्यात 24 तासात 37.7 तर 1 जून पासून आजवर 396.0 मि.मि. पाऊस झाला.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती