Tuesday, July 19, 2022

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्ह्यात कर्ज-अनुदानाच्या 180 प्रकरणांचे उद्दिष्ट

 महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे

जिल्ह्यात कर्ज-अनुदानाच्या 180 प्रकरणांचे उद्दिष्ट  

अमरावतीदि.19 : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील व्यक्तींना व्यवसायासाठी कर्ज, अनुदान योजना राबवली जाते. यंदा 180 प्रकरणांचे उद्दिष्ट निश्चित केले आहे, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापक सुरेंद्र यावलीकर यांनी दिली.

पात्र अर्जदारांनी विहित नमुन्यातील अर्जासह जातीचे, तसेच उत्पन्न प्रमाणपत्रछायाचित्रेआधारकार्ड, शिधापत्रिका रपत्रक आदींसह प्रस्ताव दि.19 ऑगस्टपर्यंत महामंडळाच्या कार्यालयात पाठविण्याचे आवाहन श्री. यावलीकर यांनी केले. हे कार्यालय अमरावतीत चांदूर रेल्वे रस्त्यावर पोलीस आयुक्तालयामागे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात आहे.

 

00000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...